• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर प्रतिभा लोणे हिला ‘चक्रवर्ती सम्राट अशोक राज्य क्रीडारत्न पुरस्कार’

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 22, 2026
in Blog
0
आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर प्रतिभा लोणे हिला ‘चक्रवर्ती सम्राट अशोक राज्य क्रीडारत्न पुरस्कार’
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

वाघिरे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा गौरव; तुर्कीतील जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सासवड / पुणे : सासवड येथील वाघिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर प्रतिभा अरुण लोणे हिला अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून प्रतिष्ठेचा ‘चक्रवर्ती सम्राट अशोक राज्य क्रीडारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. संजीवनी एज्युकेशनल, कल्चरल अँड स्पोर्ट्स रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आंबेडकरनगर, कोंढवा बुद्रुक येथे आयोजित विशेष समारंभात तिचा गौरव करण्यात आला.

RelatedPosts

शहाद्यात विजयादशमी उत्साहात; श्री प्रेस मारुती मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांची अलोट गर्दी

नांदगाव रेल्वे अंडरपासमधील दोन्ही गतिरोधक हटविले

नांदगाव रेल्वे अंडरपासमधील दोन्ही गतिरोधक हटविले

या सोहळ्यात प्रतिभा लोणे हिला सन्मानचिन्ह, मानपत्र, २० हजार रुपयांचा धनादेश, पॅट्रिक ऑलिवेल लिखित ‘सम्राट अशोक’ या पुस्तकाची प्रत, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप, सचिव तथा पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका अर्चना जगताप, खजिनदार अश्विनी सरवदे, सहसचिव प्रा. श्रीकृष्ण थेटे, अक्षय भांडे, दीपक सोनवणे आणि वैभव रणदिवे उपस्थित होते.

खेळाडूंनी सम्राट अशोकांचा आदर्श घ्यावा : अमित जगताप

समारंभात बोलताना फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप म्हणाले की, खेळाडूंनी सम्राट अशोकांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जागतिक स्तरावर यश संपादन करावे. वाघिरे महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतिभा लोणे हिने खडतर परिस्थितीवर मात करून जागतिक पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात उल्लेखनीय स्थान मिळवले आहे. अशा गुणवंत खेळाडूंच्या पाठीशी केंद्र व राज्य शासनासह संपूर्ण समाजाने भक्कमपणे उभे राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई

वाघिरे महाविद्यालयात एम.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रतिभा लोणे हिने उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे झालेल्या ओपन सीनियर नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक पटकावून सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. या दमदार कामगिरीच्या जोरावर तिची नोव्हेंबर २०२६ मध्ये इस्तंबूल, तुर्की येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड ओपन इक्विप्ड चॅम्पियनशिप २०२६’ या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

प्रतिभाच्या या यशाबद्दल वाघिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे, उपप्राचार्य डॉ. बी. यू. माने, डॉ. संजय झगडे, विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा. सचिन कुमार शहा, वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ. नरसिंग गिरी, कार्यालयीन अधीक्षक रवींद्र जाधव आणि क्रीडा संचालक प्रा. प्रितम ओव्हाळ यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले.

या पुरस्कारामुळे प्रतिभा लोणे हिच्या क्रीडा कारकिर्दीला नवी प्रेरणा मिळाली असून, आगामी जागतिक स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने तिच्या यशाकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. या समारंभाला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

नाशिक विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत अखिलेशकुमार कुऱ्हाडेची बाजी

Next Post

हिप्पळनारी येथे ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य बौद्ध धम्म प्रचार मेळावा

Related Posts

शहाद्यात विजयादशमी उत्साहात; श्री प्रेस मारुती मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांची अलोट गर्दी
Blog

शहाद्यात विजयादशमी उत्साहात; श्री प्रेस मारुती मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांची अलोट गर्दी

October 22, 2026
2
नांदगाव रेल्वे अंडरपासमधील दोन्ही गतिरोधक हटविले
Blog

नांदगाव रेल्वे अंडरपासमधील दोन्ही गतिरोधक हटविले

October 22, 2026
3
Blog

नांदगाव रेल्वे अंडरपासमधील दोन्ही गतिरोधक हटविले

October 22, 2026
4
Blog

हिप्पळनारी येथे ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य बौद्ध धम्म प्रचार मेळावा

October 22, 2026
5
नाशिक विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत अखिलेशकुमार कुऱ्हाडेची बाजी
Blog

नाशिक विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत अखिलेशकुमार कुऱ्हाडेची बाजी

October 22, 2026
7
‘गार्गी आणि इतर एकांकिका’ला राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार
Blog

‘गार्गी आणि इतर एकांकिका’ला राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार

October 22, 2026
10
Next Post

हिप्पळनारी येथे ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भव्य बौद्ध धम्म प्रचार मेळावा

ताज्या बातम्या

पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलाकडून शहीद वीरांना मानवंदना

पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलाकडून शहीद वीरांना मानवंदना

October 22, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी

October 22, 2026
शहाद्यात विजयादशमी उत्साहात; श्री प्रेस मारुती मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शहाद्यात विजयादशमी उत्साहात; श्री प्रेस मारुती मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांची अलोट गर्दी

October 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In