• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 22, 2026
in खेळ
0
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

सविता वाळके व सुरेखा मातने यांना दुहेरी यश; मुला-मुलींच्या रिले संघांचीही पदकांना गवसणी

श्रीगोंदा | प्रतिनिधी

श्रीरामपूर येथे १८ व १९ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. विविध क्रीडा प्रकारांत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची छाप पाडली. त्यांच्या या यशाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह श्रीगोंदा परिसरातून अभिनंदन होत आहे.

RelatedPosts

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

न्यू हायस्कूल, जाफराबादचे क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश; पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

या स्पर्धेत सविता वाळके हिने भालाफेक आणि गोळाफेक या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. सुरेखा मातने हिने १०,००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. रिद्धी सप्रे हिने ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.

मुलींच्या ४×४०० मीटर रिले संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या संघात समृद्धी सुद्रिक, सुरेखा मातने, रिद्धी सप्रे आणि सविता वाळके यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

मुलांच्या रिले संघानेही स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. ४×१०० मीटर रिले प्रकारात संघाने द्वितीय, तर ४×४०० मीटर रिले प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त केला. या संघात तेजस काळे, कृष्णा वायकर, रोहन चव्हाण आणि ऋषिकेश मांडगे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

या यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. कल्पना बागुल आणि क्रीडा शिक्षक संजय डफळ यांचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य बाबासाहेब भोस, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य तथा माजी आमदार राहुल जगताप, महावीर पटवा, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश साळवे, उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, उपप्राचार्य तथा जिमखाना विभागप्रमुख डॉ. नितीन थोरात, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत थोरात, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे, डॉ. राजाराम कानडे, डॉ. राहुल गायकवाड, डॉ. अनिल ढवळे, प्रा. संजय फटे तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मिळवलेल्या या यशामुळे क्रीडा क्षेत्रातील महाविद्यालयाची कामगिरी अधिक उजळली असून, त्यांच्या पुढील यशाबद्दल अपेक्षा व्यक्त होत आहेत.

Ad 1
Tags: Shrirang Salwe
Previous Post

शहाद्यात विजयादशमी उत्साहात; श्री प्रेस मारुती मंदिरात सीमोल्लंघनासाठी भाविकांची अलोट गर्दी

Next Post

पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलाकडून शहीद वीरांना मानवंदना

Related Posts

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड
खेळ

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

October 5, 2026
3
खेळ

न्यू हायस्कूल, जाफराबादचे क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश; पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड

October 5, 2026
24
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
23
सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
खेळ

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

October 2, 2026
1
बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.
खेळ

बोपगावच्या राजवीर रवी फडतरेची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित अंडर -14 स्पर्धेसाठी निवड.

August 6, 2026
74
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
17
Next Post
पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलाकडून शहीद वीरांना मानवंदना

पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलाकडून शहीद वीरांना मानवंदना

ताज्या बातम्या

दसरा व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च

दसरा व दुर्गा देवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा रूट मार्च

October 22, 2026
पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलाकडून शहीद वीरांना मानवंदना

पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलाकडून शहीद वीरांना मानवंदना

October 22, 2026
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या ॲथलेटिक्स खेळाडूंची चमकदार कामगिरी

October 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In