मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते शुभारंभ; ऊस उत्पादक शेतकरी आणि वाहतूकदारांच्या सहकार्याबद्दल मानले आभार
भुदरगड प्रतिनिधी
भुदरगड : अथणी शुगर्स लि., तांबाळे येथील भुदरगड युनिटच्या सन २०२६-२७ या वर्षातील अकराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ आणि मोळी पूजन सोहळा शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.०५ वाजता उत्साहात पार पडला. कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. श्रीनिवास श्रीमंत पाटील यांच्या हस्ते हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या मंगल प्रसंगी कारखान्याचे मुख्य अभियंता नामदेव पुंडलिक भोसले, शेती अधिकारी राजाराम शामराव आमते, चीफ केमिस्ट प्रकाश बापुसो हेदुरे, चीफ अकाउंटंट जमीर इरशाद मकानदार, कार्यालय अधीक्षक बाबासाहेब गणपती देसाई यांच्यासह कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी कामगार आणि वाहतूक कंत्राटदार यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चालू गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या सोहळ्याला भुदरगड परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार आणि कारखान्याचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.









