आरपीआय सेक्युलरतर्फे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन; बारवी धरणाचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देण्याचीही मागणी
ठाणे प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन पीक नुकसानीची पाहणी करावी, नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर), ठाणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष रविंद्र लहुजी चंदने यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन दिले.
जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला असला, तरी पावसाचे अनियमित वितरण आणि शेतीसाठी आवश्यक पाण्याची अनुपलब्धता यामुळे अनेक भागांतील पिकांचे नुकसान झाल्याचे रविंद्र चंदने यांनी निवेदनात नमूद केले. पिके करपल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना तातडीने मदत देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील काही धरणे भरलेली असतानाही धरणालगतच्या गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी वापरण्यावर निर्बंध असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. विशेषतः बारवी धरणातील पाणी शेतीसाठी वापरण्याबाबत एमआयडीसीकडून हरकत घेतली जात असल्याने आदिवासी शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड करताना अडचणी येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आदिवासी











