• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महिलांच्या इच्छाशक्तीला कुटुंबाची साथ हवी – डॉ. ममता शिवतारे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
महिलांच्या इच्छाशक्तीला कुटुंबाची साथ हवी – डॉ. ममता शिवतारे
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

सासवड येथे एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचा नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा; नऊ कर्तृत्ववान महिलांचा गौरव

पुरंदर / प्रतिनिधी :

RelatedPosts

पुरंदर तालुक्यात २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा फटका

सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने नेत्र व दंत तपासणी शिबिर

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

समाजात वावरणाऱ्या प्रत्येक महिलेचा कायम सन्मान व्हायला हवा. महिलांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती आणि कर्तृत्व असते; मात्र त्यांच्या इच्छाशक्तीला कुटुंबाची साथ मिळाली, तर त्या अधिक उंच भरारी घेऊ शकतात, असे प्रतिपादन नेवासा येथील स्वामी समर्थ साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक डॉ. ममता शिवतारे-लांडे यांनी केले.

सासवड येथील स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी पुणे येथील परिवर्तन संस्थेचे समीर जाधवराव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नऊ महिलांना यावेळी शाल, सन्मानपत्र आणि शफी पठाण लिखित ‘तुकाराम’ हे पुस्तक देऊन गौरविण्यात आले.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या महिलांचा गौरव

आपल्या मनोगतात डॉ. ममता शिवतारे यांनी प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत यश मिळविणाऱ्या महिलांचा सन्मान केल्याबद्दल प्रतिष्ठानचे कौतुक केले. तसेच सर्व पुरस्कारप्राप्त नवदुर्गांचे अभिनंदन केले. समीर जाधवराव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून पुरस्कारार्थींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. वृषाली जगताप, विजयमाला पवार, सीमा साळवे, स्नेहा धुमाळ, उज्वला बांदल, विद्या जाधव, पूजा गायकवाड, कल्पना जगताप आणि शालन कावडे या नऊ महिलांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पीएच.डी.धारक आणि राष्ट्रीय क्रिकेटपटूचाही विशेष सन्मान

या कार्यक्रमात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विषयात पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल अमृता निखिल जगताप-ताकवले यांचा, तर १९ वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल श्रेया धुमाळ हिचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. वृषाली जगताप आणि विद्या जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी केले, तर सचिव हेमंत ताकवले यांनी आभार मानले. मोहिनी लोणकर यांनी सूत्रसंचालन केले. किशोरी पवार यांनी सन्मानपत्रांचे वाचन केले.

यावेळी नगरसेविका शिल्पा जगताप, दीपाली जगताप, अॅड. अण्णासाहेब खाडे, डॉ. दीपक जगताप, रमेश कानडे, गिरीश जगताप, संजय काटकर, संदीप देवकर, शिवहार लहाने, मिलिंद इनामके, अक्षरराज जगताप, अंकुर शिवरकर, संजय जाधव, राजाराम यादव, अनिता जाधव, मीरा कानडे, दत्ता भोंगळे, रोहित खवले, सुधीर गुरव यांच्यासह अनेक मान्यवर आणि पुरस्कारार्थींचे कुटुंबीय उपस्थित होते.

Ad 1
Tags: Suresh Kamthe
Previous Post

सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने नेत्र व दंत तपासणी शिबिर

Next Post

पुरंदर तालुक्यात २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा फटका

Related Posts

ताज्या घडामोडी

पुरंदर तालुक्यात २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा फटका

October 27, 2026
1
सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने नेत्र व दंत तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने नेत्र व दंत तपासणी शिबिर

October 27, 2026
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा
ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

October 27, 2026
5
चिंचणी-वांगी पोलिसांची कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात
ताज्या घडामोडी

चिंचणी-वांगी पोलिसांची कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात

October 27, 2026
62
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात ‘मिशन खाकी’ उपक्रम उत्साहात
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात ‘मिशन खाकी’ उपक्रम उत्साहात

October 27, 2026
6
धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

October 26, 2026
4
Next Post

पुरंदर तालुक्यात २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा फटका

ताज्या बातम्या

हनुमंत महाराज निकम यांना ‘संत पाईक गौरव पुरस्कार’ प्रदान

हनुमंत महाराज निकम यांना ‘संत पाईक गौरव पुरस्कार’ प्रदान

October 27, 2026
कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी निर्माण करा! – आमदार शेखर निकम

कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी निर्माण करा! – आमदार शेखर निकम

October 27, 2026
मारेगावच्या धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात

मारेगावच्या धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात

October 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In