• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात ‘मिशन खाकी’ उपक्रम उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात ‘मिशन खाकी’ उपक्रम उत्साहात
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्धव ढवळे यांचे मार्गदर्शन; श्रीगोंद्यात ४०० मीटर धावपट्टी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात उपमुख्यमंत्री विद्यार्थी सहायता कक्ष व स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘मिशन खाकी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

RelatedPosts

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

चिंचणी-वांगी पोलिसांची कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री विद्यार्थी सहायता कक्षाचे समन्वयक उद्धव ढवळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस भरतीसाठी शारीरिक क्षमता आणि नियमित सराव यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच श्रीगोंदा नगरपरिषदेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना सरावासाठी ४०० मीटरची धावपट्टी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आगामी काळात गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पोलीस भरती प्रक्रियेत राज्य सरकार विविध बदल करत असल्याची माहितीही ढवळे यांनी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेतील बदलांची माहिती घेऊन नियोजनबद्ध तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एन. साळवे होते. स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. अनिल ढवळे यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य प्रा. श्रीकांत थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्रा. संजय फटे यांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या. प्रा. संदीप दरेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. विजय मगर यांनी आभार मानले.

‘मिशन खाकी’ उपक्रमामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले असून, सरावासाठी धावपट्टी उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे.

Ad 1
Tags: Vaibhav Farande
Previous Post

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

Next Post

चिंचणी-वांगी पोलिसांची कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात

Related Posts

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा
ताज्या घडामोडी

1
धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

October 26, 2026
3
सातारा बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचे २७ ऑक्टोबरपासून पाडकाम; एसटी प्रशासनाकडून खबरदारी
ताज्या घडामोडी

सातारा बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचे २७ ऑक्टोबरपासून पाडकाम; एसटी प्रशासनाकडून खबरदारी

October 26, 2026
1
मुल्हेर येथे बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव उत्साहात साजरा!
ताज्या घडामोडी

मुल्हेर येथे बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव उत्साहात साजरा!

October 26, 2026
2
नाशिकमध्ये अहिल्या रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न!
ताज्या घडामोडी

नाशिकमध्ये अहिल्या रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न!

October 26, 2026
21
Next Post
चिंचणी-वांगी पोलिसांची कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात

चिंचणी-वांगी पोलिसांची कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात

ताज्या बातम्या

उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!

उजनी प्रकल्पांच्या कराराची अधिकृत कागदपत्रे जाहीर करा!

October 27, 2026
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

October 27, 2026
फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

फळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा!

October 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In