एकतानगर येथील मारुती मंदिर परिसराची स्वच्छता; भाविकांकडून उपक्रमाचे स्वागत, नागरिकांनीही सहभागी होण्याचे आवाहन
मानवत (प्रतिनिधी) : सनातन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मानवत शहरातील एकतानगर येथील मारुती मंदिरात मंदिर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात समितीच्या सदस्यांसह जिज्ञासूंनी सहभाग नोंदवत मंदिर परिसर स्वच्छ केला.
मंदिर स्वच्छता उपक्रमामुळे परिसरातील स्वच्छतेला प्रोत्साहन मिळाले. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. आपल्या परिसरातील मंदिरांमध्येही अशा प्रकारचे स्वच्छता उपक्रम राबविण्यात यावेत, तसेच त्यामध्ये आपणही सहभागी होऊ, अशी भावना काही भाविकांनी व्यक्त केली.
मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, धार्मिक स्थळांची स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमासाठी समितीच्या सौ. अश्विनी रुद्रकंठवार, सौ. शितलताई लासे, सौ. मनीषाताई पिंपळे, साक्षीताई रुद्रकंठवार आणि कोमलताई नायबळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या या उपक्रमातून सामाजिक सहभाग आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. नागरिकांनीही आपल्या परिसरातील धार्मिक स्थळे स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.











