• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 29, 2026
in Blog
0
ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

शेतकरी अशोक जोगदंड यांचे आर्थिक नुकसान; पशुवैद्यकीय डॉक्टर आणि वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल

ईटकुर, ता. कळंब (प्रतिनिधी) : ईटकुर येथे गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास रानडुकरांच्या हल्ल्यात चार शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. येथील शेतकरी अशोक प्रभू जोगदंड यांच्या गोठ्यातील चार शेळ्या या हल्ल्यात दगावल्या. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे चांदूर रेल्वेत बेमुदत आंदोलन

कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

वसई पूर्वेतील मधुबन परिसरात धुळीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

पशुवैद्यकीय डॉक्टर, वनविभागाची टीम घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय डॉक्टरांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच वनविभागाची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून, घटनेची पाहणी आणि आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती आहे.

शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान

एकाच वेळी चार शेळ्यांचा मृत्यू झाल्याने अशोक प्रभू जोगदंड यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, परिसरातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नुकसानभरपाई देण्याची मागणी

संबंधित यंत्रणेने घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्याला नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच परिसरात रानडुकरांचा वावर रोखण्यासाठी वनविभागाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी आणि पशुपालकांकडून केली जात आहे.

Ad 1
Previous Post

मायणीच्या प्राथमिक शाळेतील मुलींची बाल क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी

Related Posts

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे चांदूर रेल्वेत बेमुदत आंदोलन
Blog

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे चांदूर रेल्वेत बेमुदत आंदोलन

October 29, 2026
12
कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला
Blog

कालव्यात पाय धुताना शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला

October 29, 2026
2
Blog

वसई पूर्वेतील मधुबन परिसरात धुळीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

October 29, 2026
7
आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक
Blog

आटमुर्डी परिसरातील कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीत कथित अनियमितता; शेतकरी चळवळ आक्रमक

October 29, 2026
3
मुंबईकरांनो, पुढील सात दिवस पाणी उकळून व गाळूनच प्या!
Blog

मुंबईकरांनो, पुढील सात दिवस पाणी उकळून व गाळूनच प्या!

October 29, 2026
1
आझाद समाज पार्टीच्या बीड जिल्हा पूर्वाध्यक्षपदी सनी गायसमुद्रे यांची निवड
Blog

आझाद समाज पार्टीच्या बीड जिल्हा पूर्वाध्यक्षपदी सनी गायसमुद्रे यांची निवड

October 29, 2026
2

ताज्या बातम्या

ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू

ईटकुरमध्ये रानडुकरांचा हल्ला; चार शेळ्यांचा मृत्यू

October 29, 2026

मायणीच्या प्राथमिक शाळेतील मुलींची बाल क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी

October 29, 2026
मालेगाव पोलिसांची अमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई; १ किलो ६० ग्रॅम गांजासह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

मालेगाव पोलिसांची अमली पदार्थांविरुद्ध धडक कारवाई; १ किलो ६० ग्रॅम गांजासह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

October 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In