• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिवाळी सणानिमित्त धारूर आगार सज्ज; प्रवाशांसाठी २६ जादा बसफेऱ्यांचे नियोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
दिवाळी सणानिमित्त धारूर आगार सज्ज; प्रवाशांसाठी २६ जादा बसफेऱ्यांचे नियोजन
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

१ नोव्हेंबरपासून विशेष बससेवा सुरू; पुणे, छत्रपती संभाजीनगर, आदमापूरसह प्रमुख मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या

धारूर, दि. ३० ऑक्टोबर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धारूर आगाराने विशेष नियोजन केले आहे. प्रवाशांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या गावी, नातेवाईकांकडे तसेच धार्मिक व पर्यटनस्थळांकडे सुरक्षित आणि सुखकर प्रवास करता यावा, यासाठी विविध प्रमुख मार्गांवर एकूण २६ जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या विशेष बसफेऱ्या रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहेत.

RelatedPosts

निरा कालव्याचे पाणी माळशिरस तालुक्यातील सर्व ओढ्यांना सोडा!

कर्की शिवारात अज्ञात व्यक्तींकडून केळीच्या बागेची नासधूस; १०० झाडे कापून फेकली

PCMCचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

धारूर आगारामार्फत धारूर ते आदमापूर (कोल्हापूर), मेहकर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अंबाजोगाई या मार्गांवर अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

धारूर ते आदमापूर (कोल्हापूर)

आदमापूर येथील धार्मिक स्थळाला भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. धारूरहून सकाळी ७ वाजता बस रवाना होणार असून परतीची बसही सकाळी ७ वाजता उपलब्ध असेल. ही बस कळंब, बार्शी, पंढरपूर आणि कोल्हापूरमार्गे आदमापूर येथे जाणार आहे.

धारूर ते मेहकर

मेहकर व परिसरातील प्रवाशांसाठी धारूरहून सकाळी ७.१५ वाजता बस सुटणार असून मेहकर येथून परतीची बस दुपारी २ वाजता रवाना होणार आहे.

धारूर ते पुणे

शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी नियमित सेवेसोबत अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. धारूरहून सकाळी ७.३०, ८.३०, ९ वाजता, दुपारी १ वाजता आणि रात्री ९.३० वाजता बस उपलब्ध असतील. तर पुण्याहून सकाळी ७, ८, ११.३० वाजता तसेच रात्री ९.३० आणि १० वाजता परतीच्या बस सुटतील.

धारूर ते छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. धारूरहून सकाळी ६, ६.४५, ७.४५, ८.१५ आणि ८.४५ वाजता बस सुटतील. छत्रपती संभाजीनगर येथून परतीच्या बस सकाळी ११.३० वाजता तसेच दुपारी १.१५, १.४५, २.१५ आणि २.४५ वाजता उपलब्ध असतील.

धारूर ते अंबाजोगाई दर अर्ध्या तासाला बस

धारूर ते अंबाजोगाई मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी ६.१५ ते रात्री ८.१५ वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाने बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. धारूर आणि अंबाजोगाई या दोन्ही बसस्थानकांवरून प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

एस.टी. बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

दिवाळीच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन धारूर आगाराने जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांनी सुरक्षित आणि विश्वासार्ह एस.टी. बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवाशांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि वेळेत व्हावा, यासाठी धारूर आगारातील अधिकारी व कर्मचारी कटिबद्ध असल्याचे आगार व्यवस्थापक संतोष नागनाथ महाजन यांनी सांगितले. प्रवाशांनी दिवाळी विशेष बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

“प्रवाशांच्या सेवेसाठी कटिबद्ध… सुरक्षित प्रवास, आनंदी प्रवास!”

Ad 1
Previous Post

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

Next Post

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Related Posts

निरा कालव्याचे पाणी माळशिरस तालुक्यातील सर्व ओढ्यांना सोडा!
ताज्या घडामोडी

निरा कालव्याचे पाणी माळशिरस तालुक्यातील सर्व ओढ्यांना सोडा!

October 30, 2026
2
Auto Draft
ताज्या घडामोडी

कर्की शिवारात अज्ञात व्यक्तींकडून केळीच्या बागेची नासधूस; १०० झाडे कापून फेकली

October 30, 2026
3
PCMCचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल
ताज्या घडामोडी

PCMCचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

October 30, 2026
0
शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 30, 2026
7
शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!
ताज्या घडामोडी

शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

October 30, 2026
921
गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा
ताज्या घडामोडी

गोकुळ अध्यक्ष निवडीवरून पेच; निवडणूक अधिकाऱ्यांकडून सभा तहकूब, सतेज पाटील गटाकडून समांतर अध्यक्ष निवडीची घोषणा

October 30, 2026
12
Next Post
शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीची गरुडझेप! हर्षदा राऊतची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

निरा कालव्याचे पाणी माळशिरस तालुक्यातील सर्व ओढ्यांना सोडा!

निरा कालव्याचे पाणी माळशिरस तालुक्यातील सर्व ओढ्यांना सोडा!

October 30, 2026
Auto Draft

कर्की शिवारात अज्ञात व्यक्तींकडून केळीच्या बागेची नासधूस; १०० झाडे कापून फेकली

October 30, 2026
PCMCचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

PCMCचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In