• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षकांसाठी, शिक्षकांकडून ‘कुसुमाग्रज वाचनालयाचा’ दिमाखदार शुभारंभ!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिक्षकांसाठी, शिक्षकांकडून ‘कुसुमाग्रज वाचनालयाचा’ दिमाखदार शुभारंभ!
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

तिसगाव केंद्रातील ६१ शिक्षकांचा पुढाकार; प्रारंभी १०० दर्जेदार पुस्तकांचा संग्रह उपलब्ध

प्रतिनिधी / तिसगाव : वाचन संस्कृतीला चालना देण्यासोबतच शिक्षकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढावी, या उद्देशाने पाथर्डी तालुक्यातील तिसगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या १८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ६१ शिक्षकांनी एकत्र येत ‘कुसुमाग्रज वाचनालय’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. शिक्षकांनी स्वतःच्या वर्गणीतून उभारलेल्या या वाचनालयाचा शुभारंभ उत्साहात पार पडला.

RelatedPosts

गुरुकुंज आश्रमात लाखो भाविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अर्पण करणार श्रद्धांजली

माथेरान-कर्जत मिनी बसची दुरवस्था; नवीन बस उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी

पावसाळी विश्रांतीनंतर माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरू; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या वाचनालयात सुरुवातीला विविध विषयांवरील सुमारे १०० दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ उद्घाटनापुरता मर्यादित न ठेवता पहिल्याच दिवशी केंद्रातील प्रत्येक शिक्षकाने वाचनालयातून एक पुस्तक वाचनासाठी घेतले. त्यामुळे शिक्षकांनी कृतीतूनच वाचन संस्कृतीचा श्रीगणेशा केला.

तिसगावचे सरपंच इलियास शेख यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला ऑनलाइन माध्यमातून पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिकाताई राजळे, पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्षा मंगल कोकाटे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, गटशिक्षणाधिकारी सचिन राख, विस्तार अधिकारी अनिल भवार, रामनाथ कराड, निलेश क्षीरसागर, केंद्रप्रमुख रामदास आव्हाड, विषयतज्ज्ञ संतोष नरवडे यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

शिक्षकांनी शिक्षकांसाठी सुरू केलेला हा उपक्रम वाचनाची आवड जोपासण्याबरोबरच ज्ञानाची देवाणघेवाण, अध्यापनातील नवनवीन संकल्पना आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला चालना देणारा ठरणार आहे. तिसगाव केंद्रातील शिक्षकांच्या या सामूहिक पुढाकाराचे शैक्षणिक वर्तुळातून कौतुक होत आहे.

Ad 1
Tags: Santosh Narwade
Previous Post

निरा कालव्याचे पाणी माळशिरस तालुक्यातील सर्व ओढ्यांना सोडा!

Next Post

पावसाळी विश्रांतीनंतर माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरू; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

Related Posts

गुरुकुंज आश्रमात लाखो भाविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अर्पण करणार श्रद्धांजली
ताज्या घडामोडी

गुरुकुंज आश्रमात लाखो भाविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अर्पण करणार श्रद्धांजली

October 30, 2026
2
ताज्या घडामोडी

माथेरान-कर्जत मिनी बसची दुरवस्था; नवीन बस उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी

October 30, 2026
2
पावसाळी विश्रांतीनंतर माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरू; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण
ताज्या घडामोडी

पावसाळी विश्रांतीनंतर माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरू; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

October 30, 2026
3
निरा कालव्याचे पाणी माळशिरस तालुक्यातील सर्व ओढ्यांना सोडा!
ताज्या घडामोडी

निरा कालव्याचे पाणी माळशिरस तालुक्यातील सर्व ओढ्यांना सोडा!

October 30, 2026
8
Auto Draft
ताज्या घडामोडी

कर्की शिवारात अज्ञात व्यक्तींकडून केळीच्या बागेची नासधूस; १०० झाडे कापून फेकली

October 30, 2026
3
PCMCचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल
ताज्या घडामोडी

PCMCचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

October 30, 2026
2
Next Post
पावसाळी विश्रांतीनंतर माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरू; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

पावसाळी विश्रांतीनंतर माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा सुरू; पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

ताज्या बातम्या

पाटणमध्ये ‘महायुती’तच महाभारत!

October 30, 2026
गुरुकुंज आश्रमात लाखो भाविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अर्पण करणार श्रद्धांजली

गुरुकुंज आश्रमात लाखो भाविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अर्पण करणार श्रद्धांजली

October 30, 2026

माथेरान-कर्जत मिनी बसची दुरवस्था; नवीन बस उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In