• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाटणमध्ये ‘महायुती’तच महाभारत!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 30, 2026
in राजकीय
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजितसिंह पाटणकर; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला

विधानसभेनंतर पुन्हा आमनेसामने; पाटणच्या राजकीय वर्चस्वाची कसोटी

RelatedPosts

मंठा बाजार समितीतील अविश्वास प्रस्ताव बारगळला; सभापती ए. जे. बोराडे, उपसभापती गोपाळराव बोराडे कायम

माहूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

पाटण प्रतिनिधी

सातारा : राज्यात महायुतीची सत्ता, जिल्हा पातळीवर एकत्रित निवडणूक लढविण्याची रणनीती आणि वरिष्ठ नेत्यांकडून एकजुटीचे आवाहन होत असतानाच पाटणमध्ये मात्र महायुतीतील दोन प्रमुख नेत्यांच्या समर्थकांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाई आणि भाजपचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्यातील पारंपरिक राजकीय संघर्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे पाटणमधील ही लढत केवळ एका संचालकपदापुरती मर्यादित न राहता तालुक्यातील राजकीय वर्चस्वाची प्रतिष्ठेची लढाई ठरण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेले हे दोन्ही नेते जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे पुन्हा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत सत्यजितसिंह पाटणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाकडून शंभूराज देसाई यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यानंतर पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन्ही बाजूंची ताकद पणाला लागणार असल्याने या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना यांनी जिल्हा कॅटेगरीतील दहा जागांसाठी एकत्रित रणनीती आखली आहे. जागावाटपानुसार भाजपला पाच, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, तर शिवसेनेला दोन जागा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जिल्हा पातळीवर एकजुटीचे सूत्र असतानाही स्थानिक राजकीय वर्चस्व, समर्थकांचे गट आणि नेतृत्वाची प्रतिष्ठा यांमुळे काही ठिकाणी समीकरणे गुंतागुंतीची बनली आहेत. पाटणमधील देसाई-पाटणकर यांच्यातील संघर्ष याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरत आहे. महायुतीच्या व्यापक रणनीतीचा स्थानिक राजकारणाशी कितपत मेळ बसतो, याचीही या निवडणुकीत परीक्षा होणार आहे.

पाटण तालुक्यात देसाई आणि पाटणकर यांच्यातील राजकीय संघर्ष जुना आहे. विधानसभा निवडणुकीतील थेट लढतीनंतर आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा दोन्ही बाजूंच्या समर्थकांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ठरावधारकांशी संपर्क, स्थानिक नेतृत्वाची जुळवाजुळव आणि मतांची बांधणी यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

जिल्हा बँकेतील प्रतिनिधित्व हे सहकार क्षेत्रातील प्रभावाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. त्यामुळे या निवडणुकीतील यशाचा अर्थ केवळ संचालकपद मिळविणे एवढाच नसून, आगामी काळात पाटणच्या राजकारणात कोणाची पकड अधिक मजबूत आहे, याचा संदेशही त्यातून जाऊ शकतो.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वाई, सातारा आणि खटाव येथील जागा बिनविरोध झाल्याची माहिती आहे. त्यामुळे उर्वरित आठ जागांसाठी चुरस कायम आहे. शिवसेनेच्या मंगलताई पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, इतर मतदारसंघांतील लढतींचे निकाल स्थानिक राजकीय समीकरणांवर अवलंबून राहणार आहेत. पाटणमध्येही मतदारांपर्यंत पोहोचणे, ठरावधारकांचा विश्वास संपादन करणे आणि आपापल्या गटाची ताकद एकवटणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याचे उत्तर मतदान आणि निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, पाटणमधील लढतीने आतापासूनच राजकीय उत्सुकता वाढवली आहे. एकीकडे राज्यातील महायुतीचे राजकीय गणित, तर दुसरीकडे तालुक्यातील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील संघर्ष, अशा दुहेरी समीकरणातून ही निवडणूक आकार घेत आहे. पाटणमध्ये लढत जिल्हा बँकेच्या जागेसाठी असली, तरी प्रतिष्ठा मात्र राजकीय वर्चस्वाची आहे. विधानसभेनंतर पुन्हा एकदा देसाई-पाटणकर यांच्यातील संघर्ष कोणत्या दिशेने जातो आणि या लढतीत कोणाची बाजू वरचढ ठरते, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Vaibhav Chavan
Previous Post

गुरुकुंज आश्रमात लाखो भाविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अर्पण करणार श्रद्धांजली

Next Post

जामखेड नगरपरिषदेच्या चार वर्षांच्या लेखापरीक्षणावर प्रश्नचिन्ह!

Related Posts

मंठा बाजार समितीतील अविश्वास प्रस्ताव बारगळला; सभापती ए. जे. बोराडे, उपसभापती गोपाळराव बोराडे कायम
राजकीय

मंठा बाजार समितीतील अविश्वास प्रस्ताव बारगळला; सभापती ए. जे. बोराडे, उपसभापती गोपाळराव बोराडे कायम

October 23, 2026
7
माहूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
राजकीय

माहूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

September 22, 2026
34
महाराष्ट्र

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
17
लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन
राजकारण

लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन

May 27, 2026
17
ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा
राजकारण

ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा

April 16, 2026
65
राजकीय

चाकूर येथील ज्येष्ठ वकील ॲड. डी. जे. कापसे (आबा) यांचे दुःखद निधन

April 11, 2026
14
Next Post
जामखेड नगरपरिषदेच्या चार वर्षांच्या लेखापरीक्षणावर प्रश्नचिन्ह!

जामखेड नगरपरिषदेच्या चार वर्षांच्या लेखापरीक्षणावर प्रश्नचिन्ह!

ताज्या बातम्या

मोळाचा ओढा ते कोंडवे रस्त्यावर सातारा तालुका पोलिसांची धडक मोहीम!

मोळाचा ओढा ते कोंडवे रस्त्यावर सातारा तालुका पोलिसांची धडक मोहीम!

October 30, 2026
जामखेड नगरपरिषदेच्या चार वर्षांच्या लेखापरीक्षणावर प्रश्नचिन्ह!

जामखेड नगरपरिषदेच्या चार वर्षांच्या लेखापरीक्षणावर प्रश्नचिन्ह!

October 30, 2026

पाटणमध्ये ‘महायुती’तच महाभारत!

October 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In