• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आ. दिलीप वळसे पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; २०५ जणांचे रक्तदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
आ. दिलीप वळसे पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; २०५ जणांचे रक्तदान
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व भीमाशंकर शिक्षण संस्थेचा संयुक्त उपक्रम; अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सुरेंद्र सोनवणे, लोणी प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज

RelatedPosts

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा

लोणी (ता. आंबेगाव) : माजी गृहमंत्री व सहकारमंत्री तथा आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि भीमाशंकर शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि सेवक वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी तब्बल २०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे आणि व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर शिवनेरी ब्लड सेंटर, मंचर यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले.

शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, पोपटराव थिटे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले यांच्यासह कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे उपस्थित होते.

तसेच सेक्रेटरी रामनाथ हिंगे, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट, स्टोअर कीपर अनिल बोंबले, सिव्हिल इंजिनिअर अमीर पठाण, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, भीमाशंकर शिक्षण संस्थेचे ओ.एस.डी. बी. डी. चव्हाण, कार्यालयीन अधीक्षक वसंत जाधव आणि दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य नाथा मोकाटे यांच्यासह शिक्षकवृंद व सेवक वर्ग उपस्थित होता.

शिवनेरी ब्लड सेंटरचे संचालक चंद्रभान वाघ, डॉ. वर्षा शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तसंकलन तसेच शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.

आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमात २०५ जणांनी रक्तदान केले. रक्तदान हे श्रेष्ठदान मानून सामाजिक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

Ad 1
Tags: Surendra Sonawane
Previous Post

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सरस्वतीबाई भालेपाटील विद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश

Next Post

गोंदिया जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

Related Posts

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र
ताज्या घडामोडी

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

October 31, 2026
0
दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती
ताज्या घडामोडी

दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

October 31, 2026
2
शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा
ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा

October 31, 2026
3
गोंदिया जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू
ताज्या घडामोडी

गोंदिया जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

October 31, 2026
3
बामखेडा येथे ऑक्टोबर महिन्याची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

बामखेडा येथे ऑक्टोबर महिन्याची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

October 31, 2026
3
पाणी संकट २०२६ : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही काळाची गरज!
ताज्या घडामोडी

पाणी संकट २०२६ : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही काळाची गरज!

October 31, 2026
6
Next Post
गोंदिया जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

गोंदिया जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

ताज्या बातम्या

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

October 31, 2026
दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

October 31, 2026
शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा

शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा

October 31, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In