• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खरीप पिकांसाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडणार : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
खरीप पिकांसाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडणार : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

दुष्काळी परिस्थितीत मेहकर-लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा; आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा, काटकसरीने वापरण्याचे आवाहन

मेहकर / प्रतिनिधी

RelatedPosts

ज्येष्ठ महिला राधाबाई मारोती पोतलवाड यांचे निधन

हजारो शिवसैनिकांसह शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर एल्गार; शेलूबाजार येथे रास्ता रोको आंदोलन

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

यंदा संपूर्ण महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, मेहकर तालुक्याचाही दुष्काळग्रस्त परिस्थितीत समावेश करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याचा साठा राखीव ठेवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद केले होते. त्यामुळे तूर, हरभरा, हळद आणि कपाशीसारख्या खरीप पिकांना आवश्यक पाणी न मिळाल्याने पिकांचे नुकसान होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन खरीप पिकांसाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.

गेल्या पंधरा दिवसांपासून प्रतापराव जाधव यांनी शेतकरी आणि सिंचन विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत धरणांमधील पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठा, बाष्पीभवन आणि दहा टक्के आरक्षित कोटा वगळल्यानंतर उपलब्ध होणारे पाणी शेतीसाठी कसे वापरता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी, सिंचन विभागाचे अधिकारी, पालकमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर पेनटाकळी प्रकल्पातून खरीप पिकांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे ऐन गरजेच्या वेळी मेहकर आणि लोणार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. चारा पिकांसाठीही उपलब्ध पाण्याचा उपयोग करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

या पाणीपुरवठ्याचे नियोजन आठवड्यातून तीन दिवस पाणी आणि उर्वरित चार दिवस फिडर बंद असे करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रतापराव जाधव यांनी केले.

तसेच या पाण्याचा वापर केवळ खरीप पिकांसाठी करावा, रब्बी पिकांसाठी पाण्याचा वापर करू नये आणि अवैध पाणीउपसा करू नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Ad 1
Tags: Hemantkumar Biyani
Previous Post

हजारो शिवसैनिकांसह शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर एल्गार; शेलूबाजार येथे रास्ता रोको आंदोलन

Next Post

ज्येष्ठ महिला राधाबाई मारोती पोतलवाड यांचे निधन

Related Posts

ज्येष्ठ महिला राधाबाई मारोती पोतलवाड यांचे निधन
ताज्या घडामोडी

2
हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र
ताज्या घडामोडी

हिंगणघाटमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचे सौंदर्यीकरण ठरतेय आकर्षणाचे केंद्र

October 31, 2026
1
दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती
ताज्या घडामोडी

दोड्डी गावचे सुपुत्र धनराज गिराम यांची पुणे शहर पूर्व बालविकास प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती

October 31, 2026
2
शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा
ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी द्या, अन्यथा जलसमाधी आंदोलन; मयूर बोरडे यांचा इशारा

October 31, 2026
5
गोंदिया जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू
ताज्या घडामोडी

गोंदिया जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश लागू

October 31, 2026
3
Next Post
ज्येष्ठ महिला राधाबाई मारोती पोतलवाड यांचे निधन

ज्येष्ठ महिला राधाबाई मारोती पोतलवाड यांचे निधन

ताज्या बातम्या

ज्येष्ठ महिला राधाबाई मारोती पोतलवाड यांचे निधन

ज्येष्ठ महिला राधाबाई मारोती पोतलवाड यांचे निधन

October 31, 2026
खरीप पिकांसाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडणार : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

खरीप पिकांसाठी पेनटाकळी प्रकल्पातून पाणी सोडणार : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

October 31, 2026
हजारो शिवसैनिकांसह शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर एल्गार; शेलूबाजार येथे रास्ता रोको आंदोलन

हजारो शिवसैनिकांसह शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर एल्गार; शेलूबाजार येथे रास्ता रोको आंदोलन

October 31, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In