• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

होळ येथे सायकल मार्ट दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
होळ येथे सायकल मार्ट दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

रात्री १० वाजण्याच्या सुमारास घटना; ग्रामस्थांचे आग विझविण्याचे प्रयत्न निष्फळ, दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान

केज | प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील होळ येथे सायकल मार्ट दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RelatedPosts

महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी

कोकण लोककला महोत्सव २०२७ घडवणार कोकणच्या लोककलेचा जागर

स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

होळ येथील रघुनाथ मानिक घुगे यांच्या मालकीच्या सायकल मार्ट दुकानाला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानाला आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, आग प्रचंड असल्याने ग्रामस्थांचे प्रयत्न निष्फळ ठरले. पाहता पाहता संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.

आगीचे कारण अस्पष्ट; दुकानदाराचे मोठे नुकसान

आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेमुळे रघुनाथ घुगे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कष्टाने उभा केलेला व्यवसाय आगीत उद्ध्वस्त झाल्याने नुकसानग्रस्त दुकानदाराला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

तालुक्यात आगीच्या घटनांमुळे व्यापारी आणि व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र आहे. कष्टाने उभा केलेला व्यवसाय काही क्षणांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशा दुर्घटना टाळण्यासाठी बाजारपेठांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम करणे, अग्निशमन सुविधांची उपलब्धता वाढविणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Ad 1
Tags: Kamlakar Sonawane
Previous Post

कोकण लोककला महोत्सव २०२७ घडवणार कोकणच्या लोककलेचा जागर

Next Post

महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी

Related Posts

महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी
ताज्या घडामोडी

3
स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन
ताज्या घडामोडी

स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

November 13, 2026
5
कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड
ताज्या घडामोडी

कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड

November 13, 2026
7
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!
ताज्या घडामोडी

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

November 12, 2026
21
अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग
ताज्या घडामोडी

अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

November 12, 2026
63
Next Post
महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी

महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी

ताज्या बातम्या

महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी

महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी

November 13, 2026
होळ येथे सायकल मार्ट दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

होळ येथे सायकल मार्ट दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

November 13, 2026
कोकण लोककला महोत्सव २०२७ घडवणार कोकणच्या लोककलेचा जागर

कोकण लोककला महोत्सव २०२७ घडवणार कोकणच्या लोककलेचा जागर

November 13, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In