• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६ मध्ये नवी मुंबई देशात प्रथम; विटा, पाचगणी, रत्नागिरी आणि पिंपरी-चिंचवडचाही गौरव

वार्ताहर/पनवेल : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयामार्फत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२५-२६ च्या दहाव्या आवृत्तीत महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सांगली जिल्ह्यातील विटा आणि पर्यटननगरी पाचगणी यांनीही राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. याशिवाय रत्नागिरी नगरपरिषदेला स्वच्छ तटीय शहरांच्या श्रेणीत तृतीय क्रमांक, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला राज्यातील प्रथम स्वच्छ शहराचा बहुमान मिळाला आहे.

RelatedPosts

होळ येथे सायकल मार्ट दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

कोकण लोककला महोत्सव २०२७ घडवणार कोकणच्या लोककलेचा जागर

स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्री मनोहर लाल, राज्यमंत्री तोखन साहू, सचिव सत्येंद्र सिंह यांच्यासह देशभरातील महापौर, महानगरपालिका आयुक्त, वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते विविध श्रेणींतील विजेत्या शहरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नवी मुंबईची सुपर स्वच्छ लीगमध्ये देशात प्रथम क्रमांकाची कामगिरी

नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणातील प्रतिष्ठेच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रभावी कचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया, स्वच्छ सार्वजनिक परिसर आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या बाबींमध्ये केलेल्या कामगिरीमुळे नवी मुंबईला हा बहुमान मिळाला आहे. या श्रेणीत गुजरातमधील सुरतने द्वितीय, तर आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहराने तृतीय क्रमांक मिळवला.

विटा आणि पाचगणीची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

सांगली जिल्ह्यातील विटा नगरपरिषदेने २० हजार ते ५० हजार लोकसंख्या गटात देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नियमित कचरा संकलन, कचऱ्याचे वर्गीकरण, स्वच्छता व्यवस्थापन आणि नागरिकांचा सहभाग या माध्यमातून विटा शहराने उल्लेखनीय कामगिरी केली.

तर २० हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत पर्यटननगरी पाचगणीने द्वितीय क्रमांक मिळवून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

रत्नागिरी नगरपरिषदेला स्वच्छ तटीय शहर श्रेणीत तृतीय क्रमांक

कोकणातील रत्नागिरी नगरपरिषदेने स्वच्छ तटीय शहरांच्या श्रेणीत देशात तृतीय क्रमांक पटकावला आहे. किनारपट्टीची स्वच्छता, सागरी प्रदूषण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे. रत्नागिरीला राज्यातील प्रथम स्वच्छ शहराचा बहुमानही मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवडला राज्यातील प्रथम स्वच्छ शहराचा बहुमान

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला ‘स्टेट फर्स्ट स्वच्छ सिटी’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नियमित कचरा संकलन, स्वच्छता सेवा, सार्वजनिक परिसराचे सुशोभीकरण, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि नागरिकाभिमुख उपक्रमांमुळे महानगरपालिकेने ही कामगिरी केली आहे.

स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी : राष्ट्रपती

पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. स्वच्छता हा केवळ सार्वजनिक परिसराच्या सौंदर्याचा विषय नसून नागरिकांचे आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे, असे त्यांनी नमूद केले. ‘बढाए हाथ, करें सफाई साथ’ या संकल्पनेतून नागरिकांच्या सक्रिय सहभागाने स्वच्छतेची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

देशात शहरी कचरा प्रक्रियेचे प्रमाण ८० टक्क्यांवर

केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात झालेल्या प्रगतीची माहिती दिली. २०१४ मध्ये शहरी कचऱ्यावर केवळ १६ टक्के प्रक्रिया केली जात होती. हे प्रमाण आता ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. देशातील ९६ टक्क्यांहून अधिक घरांमधून घरपोच कचरा संकलन केले जात असून, ४ हजार ७५१ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाची व्याप्ती पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील विविध शहरांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश स्वच्छता व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करणारे ठरले आहे.

Ad 1
Tags: Avinash Jadhav
Previous Post

होळ येथे सायकल मार्ट दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

Next Post

महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा

Related Posts

होळ येथे सायकल मार्ट दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक
ताज्या घडामोडी

होळ येथे सायकल मार्ट दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

November 13, 2026
8
कोकण लोककला महोत्सव २०२७ घडवणार कोकणच्या लोककलेचा जागर
ताज्या घडामोडी

कोकण लोककला महोत्सव २०२७ घडवणार कोकणच्या लोककलेचा जागर

November 13, 2026
3
स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन
ताज्या घडामोडी

स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

November 13, 2026
5
कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड
ताज्या घडामोडी

कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड

November 13, 2026
7
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!
ताज्या घडामोडी

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

November 12, 2026
21
अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग
ताज्या घडामोडी

अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

November 12, 2026
63
Next Post
महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा

महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा

ताज्या बातम्या

महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा

महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर; थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा

November 13, 2026
महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी

महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी

November 13, 2026
होळ येथे सायकल मार्ट दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

होळ येथे सायकल मार्ट दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

November 13, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In