कुमठा बु. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण; मान्यवरांसह शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती
अहमदपूर | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचा कुमठा येथे उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा त्यांच्या विचारांचा कायम जागर करेल. या पुतळ्याच्या आणि स्मारकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणावेत आणि त्यांच्या आदर्शानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
अहमदपूर तालुक्यातील कुमठा बु. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सहकारमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव होते. व्यासपीठावर माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, जिल्हा परिषद लातूरचे उपाध्यक्ष दयानंदराव सुरवसे, समाजकल्याण सभापती उत्तमराव माने, जिल्हा परिषद सदस्य अजिंक्य देशमुख, नगराध्यक्ष ॲड. स्वप्निल व्हते, माजी सभापती कल्याणराव पाटील, नवनाथ कोटसुलवार, प्रदेश सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे, व्हाईस चेअरमन निवृत्तीराव कांबळे, सभापती सुरजभैय्या पाटील, चेअरमन ज्ञानेश्वर भांगे, सरपंच युवराज कोडगिरे, कार्यकारी नगरसेवक प्रशांत भोसले, सरपंच करीम सौदागर आणि प्रोटोकॉल ऑफिसर शिवकुमार लोलपे यांची उपस्थिती होती.
तसेच पंचायत समिती सदस्य कृष्णराज भोसले पाटील, जयराम पवार, विकास महाजन, सुधीर गोरटे, राम मुळके, बळीराम भिंगोले गुरुजी, अंकुशराव कानवटे, आर. डी. शेळके, शामराव टीकोरे, सुधीर भोसले सर, माधवराव पाटील, उपसरपंच वसंतराव जाधव, वसंतराव गुळवे, प्रदीप भोसले, अक्षय गुळवे, अतुल जाधव, गजेंद्रसिंग बयास, ज्ञानोबा ढोकाडे, उमाकांत सूर्यवंशी, शैलेश घयास, सुनील गुळवे, तुकाराम मरवाळे, बाबुराव पाटील, व्यंकटराव शेळके, बाळू व्हते, प्रवीण भिंगोले, जयपालसिंग बयास, संदीप भोसले, बळीराम नेवाळे, बालाजी जाधव, संभाजी ढोकाडे, मारुती माळवदे आणि गिरीश कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
शिवप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला गावातील शिवप्रेमी, ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महाराजांच्या स्मारकाच्या माध्यमातून त्यांचे शौर्य, स्वराज्याची संकल्पना, न्यायप्रियता आणि जनकल्याणकारी विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचतील, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
कुमठा बु. येथे पार पडलेल्या या अनावरण सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.











