• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बदलापुरातील पाणीगळतीच्या तक्रारीची वरिष्ठ स्तरावर गंभीर दखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
बदलापुरातील पाणीगळतीच्या तक्रारीची वरिष्ठ स्तरावर गंभीर दखल
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ कार्यालयाला तातडीच्या कार्यवाहीचे आदेश; हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याचा प्रकार

कल्याण | प्रतिनिधी :

बदलापूर शहरातील विविध भागांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजिप्रा) जलवाहिन्यांना गळती लागून दररोज हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याच्या तक्रारीची अखेर वरिष्ठ स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी ठाणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने अंबरनाथ येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाला पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्षात पाणीगळती रोखण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RelatedPosts

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विचारांचा कायम जागर करेल : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी

होळ येथे सायकल मार्ट दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

शहरातील विविध भागांत जलवाहिन्यांना गळती

बदलापूर शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील सोनिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर, म्हाडा वसाहतीच्या गेटसमोर तसेच यादव नगर परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिन्या वारंवार फुटत असल्याने मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे.

या गंभीर समस्येबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊनही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकीकडे नागरिकांना पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

१० नोव्हेंबरला ई-मेलद्वारे अधिकृत तक्रार

संबंधित अधिकाऱ्यांच्या कथित निष्क्रियतेविरोधात दैनिक ‘चालू वार्ता’चे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी तथा कल्याण तालुका भ्रष्टाचार विरोधी समितीचे अध्यक्ष विकी कुंडलिक जाधव यांनी १० नोव्हेंबर २०२६ रोजी ई-मेलद्वारे अधिकृत तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीमध्ये पाणीगळतीच्या समस्येची सखोल चौकशी करावी, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका तपासावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

अंबरनाथ कार्यालयाकडे तक्रार वर्ग

या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन दानवे यांनी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत पत्र जारी केले आहे.

सदर तक्रार अंबरनाथ उपविभागाशी संबंधित असल्याचे नमूद करून मूळ तक्रार अर्ज पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी अंबरनाथ येथील कार्यकारी अभियंता (म.जी.प्रा. जलव्यवस्थापन विभाग) यांच्या कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. या पत्राची प्रत माहितीसाठी ठाणे येथील मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांनाही पाठविण्यात आली आहे.

जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?

प्रशासकीय स्तरावर तक्रारीची दखल घेऊन पत्रव्यवहार सुरू झाला असला, तरी प्रत्यक्षात जलवाहिन्यांची दुरुस्ती कधी होणार, पाणीगळती रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केव्हा केल्या जाणार आणि याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असे सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

पिण्याचे पाणी ही अत्यंत मौल्यवान नैसर्गिक संपत्ती असून त्याची अशा प्रकारे होणारी नासाडी थांबविणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून जलवाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Ad 1
Tags: Jogendra Jadhav
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विचारांचा कायम जागर करेल : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Next Post

येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!

Related Posts

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विचारांचा कायम जागर करेल : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विचारांचा कायम जागर करेल : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

November 13, 2026
7
महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी
ताज्या घडामोडी

महाराष्ट्राची राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेत बाजी

November 13, 2026
4
होळ येथे सायकल मार्ट दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक
ताज्या घडामोडी

होळ येथे सायकल मार्ट दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

November 13, 2026
35
कोकण लोककला महोत्सव २०२७ घडवणार कोकणच्या लोककलेचा जागर
ताज्या घडामोडी

कोकण लोककला महोत्सव २०२७ घडवणार कोकणच्या लोककलेचा जागर

November 13, 2026
7
स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन
ताज्या घडामोडी

स्वर्गीय अरविंद अण्णा कुवर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन

November 13, 2026
5
कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड
ताज्या घडामोडी

कृष्णा परबळे, आदित्य ठोके व प्रथमेश खोमणे यांच्या पुढाकाराने नांदूर घाटमध्ये गरजूंची दिवाळी गोड

November 13, 2026
8
Next Post
येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!

येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!

ताज्या बातम्या

येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!

येरमाळ्यात श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!

November 13, 2026
बदलापुरातील पाणीगळतीच्या तक्रारीची वरिष्ठ स्तरावर गंभीर दखल

बदलापुरातील पाणीगळतीच्या तक्रारीची वरिष्ठ स्तरावर गंभीर दखल

November 13, 2026
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विचारांचा कायम जागर करेल : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विचारांचा कायम जागर करेल : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

November 13, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In