• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांच्या हस्ते रायगड तोफच्या ‘देवमाणूस’ अंकाचे प्रकाशन उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांच्या हस्ते रायगड तोफच्या ‘देवमाणूस’ अंकाचे प्रकाशन उत्साहात
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण करण्याची केंद्र सरकारकडे मागणी

उरण | प्रतिनिधी

RelatedPosts

सातारा शहरातील राधिका रोडवर अतिक्रमणांचा विळखा

पंढरपूर दिंडीच्या स्नेहभोजन सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा रमेश आडसकर यांच्या हस्ते सत्कार

वेळापूरच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा

संघर्षाच्या जात्यावर स्वतःच्या आयुष्याचे पीठ करून कष्टकरी शेतकरी आणि श्रमजीवी जनतेला स्वाभिमानाने जगण्याचे सामर्थ्य देणारे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या कार्याप्रति आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी भूमिपुत्रांसह रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील जनतेची आहे. केंद्र सरकारने जनभावनेचा आदर करून विमानतळाचे नामकरण करावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) उरण तालुका चिटणीस रवी घरत यांनी केले.

उरण येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत ठाकूर यांच्या पुढाकाराने रायगड तोफच्या ‘देवमाणूस’ या विशेष अंकाचे प्रकाशन आयोजित करण्यात आले होते. शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उरण तालुका शेकापप्रणीत सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष डी. आर. ठाकूर होते.

यावेळी संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सुहास घरत, कार्याध्यक्ष यशवंत ठाकूर, सचिव काशिनाथ भोईर, सल्लागार दत्ता घरत, खजिनदार मनोहर पाटील, प्रकाश पाटील, रमेश कोळी, भ. पो. म्हात्रे, स. ही. पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विमानतळ नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे; निर्णयाची प्रतीक्षा

यावेळी रवी घरत पुढे म्हणाले की, ज्या भूमीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहत आहे, ती लोकनेते दि. बा. पाटील यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. येथील भूमिपुत्रांनी त्यांना पाच वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार म्हणून निवडून दिले होते. त्यांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी संघर्ष केला.

विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमताने ठराव मंजूर करून तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप नामकरणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये नाराजी असून, केंद्र सरकारने जनभावनेचा आदर करून लवकरात लवकर नामकरण करावे, असे आवाहन रवी घरत यांनी केले.

जनभावनेचा आदर करण्याचे मान्यवरांचे आवाहन

कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. आर. ठाकूर आणि दत्ता घरत यांनीही विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देऊन भूमिपुत्रांच्या भावनांचा आदर करावा, असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत रायगड तोफचे संस्थापक-संपादक रामचंद्र म्हात्रे यांनी केले. यशवंत ठाकूर यांनी प्रास्ताविक केले तसेच सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. या कार्यक्रमाला प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Vitthal Mamtabade
Previous Post

सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी

Next Post

पंढरपूर दिंडीच्या स्नेहभोजन सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा रमेश आडसकर यांच्या हस्ते सत्कार

Related Posts

सातारा शहरातील राधिका रोडवर अतिक्रमणांचा विळखा
ताज्या घडामोडी

सातारा शहरातील राधिका रोडवर अतिक्रमणांचा विळखा

November 14, 2026
2

3
वेळापूरच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा
ताज्या घडामोडी

वेळापूरच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा

November 14, 2026
2
कुरुंदवाड नगरवाचनालयात १७ नोव्हेंबरपासून शरद व्याख्यानमालेचे आयोजन
ताज्या घडामोडी

कुरुंदवाड नगरवाचनालयात १७ नोव्हेंबरपासून शरद व्याख्यानमालेचे आयोजन

November 14, 2026
12
केज येथे आज धम्मदेशना, गुणवंतांचा सत्कार व महापुरुषांच्या शिल्पाचे अनावरण
ताज्या घडामोडी

केज येथे आज धम्मदेशना, गुणवंतांचा सत्कार व महापुरुषांच्या शिल्पाचे अनावरण

November 14, 2026
3
नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या
ताज्या घडामोडी

नीरा-भीमा आणि जेऊर बोगद्यांची बंद पडलेली कामे तातडीने सुरू करा; मराठवाड्याचे हक्काचे पाणी लवकर द्या

November 13, 2026
2
Next Post
पंढरपूर दिंडीच्या स्नेहभोजन सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा रमेश आडसकर यांच्या हस्ते सत्कार

पंढरपूर दिंडीच्या स्नेहभोजन सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा रमेश आडसकर यांच्या हस्ते सत्कार

ताज्या बातम्या

सातारा शहरातील राधिका रोडवर अतिक्रमणांचा विळखा

सातारा शहरातील राधिका रोडवर अतिक्रमणांचा विळखा

November 14, 2026
पंढरपूर दिंडीच्या स्नेहभोजन सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा रमेश आडसकर यांच्या हस्ते सत्कार

पंढरपूर दिंडीच्या स्नेहभोजन सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा रमेश आडसकर यांच्या हस्ते सत्कार

November 14, 2026
शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांच्या हस्ते रायगड तोफच्या ‘देवमाणूस’ अंकाचे प्रकाशन उत्साहात

शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांच्या हस्ते रायगड तोफच्या ‘देवमाणूस’ अंकाचे प्रकाशन उत्साहात

November 14, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In