• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वसंत सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

मोळी पूजन व गव्हाण पूजनाने हंगामाला सुरुवात; शेतकरी आणि कामगारांनी सहकार्य करण्याचे आमदार हेमंत पाटील यांचे आवाहन

पोफाळी | दि. १५ नोव्हेंबर

RelatedPosts

गुरांची कोंबून वाहतूक; आठ बैलांची पोलिसांकडून सुटका

पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; गुजरखेडे येथे १०० आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप

वसंत सहकारी साखर कारखाना द्वार भैरवनाथ शुगर वर्क्स, वसंतनगर पोफाळी येथे सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी उत्साहात करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने मोळी पूजन आणि गव्हाण पूजन करून गळीत हंगामाला प्रारंभ झाला.

यावेळी कारखाना परिसरात बैलजोडी, ट्रॅक्टर, वजनकाटा आणि मोळीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गव्हाणीत ऊस टाकून गाळप हंगाम सुरू करण्यात आला. यंदा कारखान्याने ऊस गाळपाचे मोठे उद्दिष्ट ठेवले असून, शेतकऱ्यांना वेळेवर आणि चांगला भाव देण्याचा विश्वास कारखाना व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला कारखान्याचे चेअरमन अजय देशमुख, भैरवनाथ शुगरचे अधिकारी, आमदार हेमंत पाटील, उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे, रमेश चव्हाण, भीमराव चंद्रवंशी, चिंतागाराव कदम, राजश्रीताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच परिसरातील प्रतिष्ठित शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, कर्मचारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून कारखाना सुरू होणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, प्रत्यक्ष गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी ऊस तोडणी आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शेतकरी आणि कामगारांच्या सहकार्याने यंदाचा हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

वसंत सहकारी साखर कारखाना हा या भागाचे वैभव असून, तो प्रामाणिकपणे सुरू ठेवण्याचा आपला मानस असल्याचे आमदार हेमंत पाटील यांनी सांगितले. कारखाना सुरू होऊन चार वर्षे होत असली, तरी अद्याप कारखान्यातून एक रुपयाचीही कमाई झालेली नाही, असे त्यांनी नमूद केले.

तरीही हा कारखाना जोमाने सुरू ठेवायचा असून, परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. यासाठी परिसरातील सर्व शेतकरी आणि कारखान्याच्या कामगारांनी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार हेमंत पाटील यांनी केले.

Ad 1
Tags: Gautam Kamble
Previous Post

गुरांची कोंबून वाहतूक; आठ बैलांची पोलिसांकडून सुटका

Related Posts

गुरांची कोंबून वाहतूक; आठ बैलांची पोलिसांकडून सुटका
ताज्या घडामोडी

गुरांची कोंबून वाहतूक; आठ बैलांची पोलिसांकडून सुटका

November 16, 2026
5
पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट
ताज्या घडामोडी

पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट

November 16, 2026
0
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; गुजरखेडे येथे १०० आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप
ताज्या घडामोडी

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; गुजरखेडे येथे १०० आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप

November 16, 2026
3
सिव्हिल इंजिनिअर्ससाठी ९३४ सरकारी पदांची भरती
ताज्या घडामोडी

सिव्हिल इंजिनिअर्ससाठी ९३४ सरकारी पदांची भरती

November 16, 2026
2
पेपर विक्रेत्याच्या मुलाची वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णभरारी
ताज्या घडामोडी

पेपर विक्रेत्याच्या मुलाची वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णभरारी

November 16, 2026
6
ताज्या घडामोडी

राष्ट्रीय पत्रकारिता दिन : स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेचा सन्मान

November 16, 2026
7

ताज्या बातम्या

वसंत सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ

वसंत सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ

November 16, 2026
गुरांची कोंबून वाहतूक; आठ बैलांची पोलिसांकडून सुटका

गुरांची कोंबून वाहतूक; आठ बैलांची पोलिसांकडून सुटका

November 16, 2026
पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट

पिवंदळ बु. परिसरात कापसाचा हंगाम नोव्हेंबरमध्येच संपला; उत्पादनात मोठी घट

November 16, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In