• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माडखोल धनगरवाडीच्या हक्काचा निधी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न उघड; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचा विरोध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
माडखोल धनगरवाडीच्या हक्काचा निधी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न उघड; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचा विरोध
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले; धनगरवाडीबाहेरील कामांना ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, अन्यथा आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी | प्रतिनिधी :

मौजे माडखोल (ता. सावंतवाडी) येथील धनगरवाडी वस्तीच्या विकासासाठी मंजूर होणारा निधी मूळ वस्तीपासून दूर असलेल्या कामांवर खर्च करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रीय दिव्यांग पार्टीने केला आहे. या प्रकाराविरोधात पक्षाचे नेते संजय बाबुराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्या व माडखोल धनगरवाडीतील ग्रामस्थांनी १९ नोव्हेंबर रोजी सहाय्यक संचालक (इतर मागास बहुजन कल्याण), सिंधुदुर्ग आणि माडखोल ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली.

RelatedPosts

सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न

लोणी काळभोर परिसरात विजेचा लपंडाव; कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे शेतकरी व व्यावसायिक त्रस्त

उमरखेड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला; ग्रामीण भागात हुडहुडी, जनजीवनावर परिणाम

वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजनेंतर्गत सन २०२६-२७ साठी माडखोल गावातील दोन रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. मात्र, प्रस्तावित दोन्ही कामे मूळ धनगरवाडी वस्तीपासून दूर असून, त्यांचा धनगर समाजातील वस्तीधारकांना थेट लाभ होणार नसल्याचा आक्षेप तक्रारदारांनी घेतला आहे. दुसरीकडे, धनगरवाडीचा मुख्य रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला असून, ग्रामस्थांसह वृद्ध नागरिक आणि विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

या प्रकरणी राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे नेते संजय बाबुराव देसाई, येसार सोशल फाउंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्या वासंती महेश परुळेकर, महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ, पुणेच्या सामाजिक कार्यकर्त्या अन्विता अभय जाधव, माजी पोलीस पाटील लक्ष्मण बरागडे आणि सौ. जान्हवी पाटील यांनी ग्रामस्थांसह प्रशासनाकडे भूमिका मांडली.

तांडा-वस्ती सुधार योजनेचा निधी संबंधित वस्तीतील नागरिकांना थेट लाभ होईल अशाच कामांसाठी खर्च करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. धनगरवाडीबाहेरील कामांना ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देऊ नये आणि धनगरवाडीच्या मुख्य रस्त्याचा सुधारित प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठवावा, अशी मागणीही करण्यात आली.

या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राष्ट्रीय दिव्यांग पार्टीच्या वतीने धनगरवाडीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संजय बाबुराव देसाई, वासंती महेश परुळेकर, अन्विता अभय जाधव आणि माजी पोलीस पाटील लक्ष्मण बरागडे यांनी दिला.

यावेळी धनगरवाडीतील ग्रामपंचायत सदस्य सौ. जान्हवी जणू पाटील, ज्येष्ठ नागरिक बाबू येडगे, खंडू बरागडे, रवी येडगे, राजेश येडगे, गंगाराम बरागडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 1
Tags: Manoj Satose
Previous Post

लोणी काळभोर परिसरात विजेचा लपंडाव; कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे शेतकरी व व्यावसायिक त्रस्त

Next Post

सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न

Related Posts

सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न
ताज्या घडामोडी

सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न

November 20, 2026
0
लोणी काळभोर परिसरात विजेचा लपंडाव; कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे शेतकरी व व्यावसायिक त्रस्त
ताज्या घडामोडी

लोणी काळभोर परिसरात विजेचा लपंडाव; कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे शेतकरी व व्यावसायिक त्रस्त

November 20, 2026
1
उमरखेड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला; ग्रामीण भागात हुडहुडी, जनजीवनावर परिणाम
ताज्या घडामोडी

उमरखेड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला; ग्रामीण भागात हुडहुडी, जनजीवनावर परिणाम

November 20, 2026
4
सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; अवघे जनजीवन गारठले
ताज्या घडामोडी

सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला; अवघे जनजीवन गारठले

November 20, 2026
3
पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे ४९ वर्षीय शिक्षिकेची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ
ताज्या घडामोडी

पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे ४९ वर्षीय शिक्षिकेची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

November 20, 2026
25
तांदळा परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; माहूर तालुक्यात खळबळ
ताज्या घडामोडी

तांदळा परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; माहूर तालुक्यात खळबळ

November 20, 2026
24
Next Post
सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न

सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न

ताज्या बातम्या

सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न

सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न

November 20, 2026
माडखोल धनगरवाडीच्या हक्काचा निधी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न उघड; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचा विरोध

माडखोल धनगरवाडीच्या हक्काचा निधी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न उघड; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचा विरोध

November 20, 2026
लोणी काळभोर परिसरात विजेचा लपंडाव; कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे शेतकरी व व्यावसायिक त्रस्त

लोणी काळभोर परिसरात विजेचा लपंडाव; कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे शेतकरी व व्यावसायिक त्रस्त

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In