मृतदेह १२ ते १५ दिवसांपूर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज; मृत्यूचे कारण आणि व्यक्तीची ओळख अद्याप अस्पष्ट
माहूर | प्रतिनिधी :
माहूर तालुक्यातील तांदळा परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सदर मृतदेह अंदाजे १२ ते १५ दिवसांपूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीची ओळख पटली आहे की नाही, तसेच मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या घटनेबाबत परिसरात विविध चर्चा सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर मृत व्यक्तीची ओळख आणि मृत्यूचे कारण याबाबत अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.









