विमा रकमेतून कर्ज खाते निल; वारसांना तारण ठेवलेले सोन्याचे दागिने परत
माजलगाव | प्रतिनिधी :
माजलगाव शाखेतील सोनेतारण कर्जदार श्री. पवार राजेभाऊ विठ्ठलराव यांचे दुःखद निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने तुळजाभवानी अर्बनच्या माध्यमातून संबंधित विमा कंपनीकडे विमा दावा दाखल करण्यात आला होता. संस्थेच्या प्रयत्नांना यश मिळून विमा कंपनीमार्फत ९० हजार रुपये (नव्वद हजार रुपये) विमा रक्कम मंजूर करण्यात आली.
मंजूर झालेल्या विमा रकमेतून संबंधित सोनेतारण कर्ज खाते निल करण्यात आले. त्यानंतर कर्जविषयक संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून तारण ठेवलेले सोन्याचे दागिने मयत कर्जदाराच्या वारसांना परत करण्यात आले.
या वेळी तुळजाभवानी अर्बनच्या माजलगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. सोनटके साहेब उपस्थित होते.
ग्राहकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार आणि सुरक्षा मिळवून देण्यासाठी तुळजाभवानी अर्बनने केलेला हा उपक्रम संस्थेची ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी आणि सामाजिक उत्तरदायित्व अधोरेखित करणारा ठरला आहे.











