• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रहार लघुपट स्पर्धेच्या अंतिम ९६ लघुपटांमध्ये ‘मी हरलो नाही…’ आणि ‘साथ एकनाथांची…’ यांची अधिकृत निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रहार लघुपट स्पर्धेच्या अंतिम ९६ लघुपटांमध्ये ‘मी हरलो नाही…’ आणि ‘साथ एकनाथांची…’ यांची अधिकृत निवड
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

रागिनी स्टुडिओ, मेहकरच्या दोन्ही लघुपटांची यशस्वी घोडदौड; बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

मेहकर | प्रतिनिधी :

माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार चित्रपट संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रहार लघुपट स्पर्धे’च्या अंतिम फेरीसाठी निवडलेल्या ९६ लघुपटांमध्ये मेहकर येथील रागिनी स्टुडिओ निर्मित ‘मी हरलो नाही…’ आणि ‘साथ एकनाथांची…’ या दोन्ही लघुपटांची अधिकृत निवड झाली आहे. या निवडीमुळे मेहकरसह बुलढाणा जिल्ह्याच्या चित्रपट निर्मिती क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो गांजा जप्त

मयत सोनेतारण कर्जदाराच्या कुटुंबीयांना तुळजाभवानी अर्बनचा दिलासा; विमा कंपनीकडून ९० हजार रुपये मंजूर

सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या लघुपट महोत्सवात तब्बल ११ लाख रुपयांची रोख पारितोषिके आणि ‘प्रहार करंडक’ प्रदान करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती प्रहार चित्रपट संघटनेचे संदीप मोहिते यांनी दिली.

विशिष्ट विषयावर आधारित या स्पर्धेत देशभरातून शेकडो लघुपटांच्या प्रवेशिका दाखल झाल्या होत्या. परीक्षक मंडळ आणि त्यांच्या टीमने विविध फेऱ्यांमधून परीक्षण करून अंतिम फेरीसाठी देशभरातील ९६ दर्जेदार लघुपटांची निवड केली. या प्रतिष्ठेच्या यादीत रागिनी स्टुडिओच्या दोन्ही लघुपटांनी स्थान मिळवले आहे.

‘मी हरलो नाही…’ आणि ‘साथ एकनाथांची…’ या लघुपटांचे दिग्दर्शन प्रमोद ताजने यांनी केले आहे. कथा लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. छायाचित्रण सुनील अंभोरे आणि रामदास भगत (रागिनी स्टुडिओ, मेहकर) यांनी केले आहे. संगीत गणेश कांडेकर यांनी दिले असून, मेकअप आणि हेअरची जबाबदारी संजीवनी नितीन मोरे यांनी पार पाडली.

या लघुपटांमध्ये गणेश चहारे, पल्लवी चापले, किसन बळी, सुरेखा सुरुशे, डॉ. सुभाष खुरद, राजू रोकडे, गणेश मुंढे, अनुष्का सुरुशे, कोमल मोहड, पूनम ठोमरे, डॉ. अर्चना ठोसरे, सुनीता कुडके आदी कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. बालकलाकार आदित्य कानोडजे यांच्यासह गजानन नागोलकर, स्वप्नील काळासरे आणि संदीप काळे यांनी विशेष सहकार्य केले.

दिग्दर्शक प्रमोद ताजने हे आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर लघुपट आणि व्हिडिओ साँग तयार करून समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने करीत आहेत. वास्तववादी आणि सामाजिक आशय असलेल्या विषयांना प्रभावी कलात्मक सादरीकरणाची जोड देत रागिनी स्टुडिओच्या संपूर्ण टीमने या दोन्ही लघुपटांच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

प्रहार लघुपट स्पर्धेच्या अंतिम ९६ लघुपटांमध्ये अधिकृत निवड होणे ही मेहकरसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. या यशाबद्दल रागिनी स्टुडिओच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Ad 1
Previous Post

मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो गांजा जप्त

Related Posts

मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो गांजा जप्त
ताज्या घडामोडी

मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो गांजा जप्त

November 20, 2026
0
मयत सोनेतारण कर्जदाराच्या कुटुंबीयांना तुळजाभवानी अर्बनचा दिलासा; विमा कंपनीकडून ९० हजार रुपये मंजूर
ताज्या घडामोडी

मयत सोनेतारण कर्जदाराच्या कुटुंबीयांना तुळजाभवानी अर्बनचा दिलासा; विमा कंपनीकडून ९० हजार रुपये मंजूर

November 20, 2026
3
सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न
ताज्या घडामोडी

सुरेगाव गंगा येथे ह.भ.प. ओम महाराज शिंदे पाटील यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न

November 20, 2026
16
माडखोल धनगरवाडीच्या हक्काचा निधी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न उघड; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचा विरोध
ताज्या घडामोडी

माडखोल धनगरवाडीच्या हक्काचा निधी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न उघड; राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचा विरोध

November 20, 2026
1
लोणी काळभोर परिसरात विजेचा लपंडाव; कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे शेतकरी व व्यावसायिक त्रस्त
ताज्या घडामोडी

लोणी काळभोर परिसरात विजेचा लपंडाव; कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे शेतकरी व व्यावसायिक त्रस्त

November 20, 2026
2
उमरखेड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला; ग्रामीण भागात हुडहुडी, जनजीवनावर परिणाम
ताज्या घडामोडी

उमरखेड तालुक्यात थंडीचा कडाका वाढला; ग्रामीण भागात हुडहुडी, जनजीवनावर परिणाम

November 20, 2026
6

ताज्या बातम्या

प्रहार लघुपट स्पर्धेच्या अंतिम ९६ लघुपटांमध्ये ‘मी हरलो नाही…’ आणि ‘साथ एकनाथांची…’ यांची अधिकृत निवड

प्रहार लघुपट स्पर्धेच्या अंतिम ९६ लघुपटांमध्ये ‘मी हरलो नाही…’ आणि ‘साथ एकनाथांची…’ यांची अधिकृत निवड

November 20, 2026
मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो गांजा जप्त

मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो गांजा जप्त

November 20, 2026
मयत सोनेतारण कर्जदाराच्या कुटुंबीयांना तुळजाभवानी अर्बनचा दिलासा; विमा कंपनीकडून ९० हजार रुपये मंजूर

मयत सोनेतारण कर्जदाराच्या कुटुंबीयांना तुळजाभवानी अर्बनचा दिलासा; विमा कंपनीकडून ९० हजार रुपये मंजूर

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In