काँग्रेस कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन; माजी पंतप्रधानांच्या कार्याला उजाळा
खात (ता. मौदा) | प्रतिनिधी :
भारताच्या माजी पंतप्रधान तथा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी मौदा तालुक्यातील खात येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये असलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला काँग्रेस कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. देशाच्या राजकारणातील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका, प्रभावी नेतृत्व, निर्णयक्षमता आणि देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण यावेळी करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमाला ज्ञानेश्वर वानखेडे (अध्यक्ष, काँग्रेस कमिटी, मौदा तालुका), तुळशीराम काळमेघ (अध्यक्ष, सेवा दल, नागपूर ग्रामीण), राजेंद्र लांडे (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, मौदा), जामुवंत ठाकरे (अध्यक्ष, काँग्रेस कमिटी, खात), राजकुमार ठवकर (माजी सभापती, पंचायत समिती, मौदा), दुर्गाबाई ठाकरे (सदस्य, पंचायत समिती, मौदा), ज्योतिपाल गजभिये (माजी उपसरपंच, ग्रामपंचायत खात), राकेश बागडे (सदस्य, ग्रामपंचायत खात), अशोकजी दीक्षित, ज्ञानेश्वर आकरे, ज्योतीताई डहाके (माजी सरपंच, ग्रामपंचायत खात), मंगेशजी तलमले (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, मौदा), शैलेश ठाकरे, नामदेव देवतारे, लंकेश ढोलवार (अध्यक्ष, सेवा दल, मौदा तालुका), शांताबाई पटले, राजीन देवतारे, जालिंदरसिंहजी, रमण पटले, अर्पित धावडे, शरीफ पठाण, सोनू रामटेके आदी उपस्थित होते.
इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.










