आमदार काशिनाथ दाते यांच्या पाठपुराव्याला यश; प्रत्येक बसथांब्यासाठी २० लाख रुपयांची तरतूद
पारनेर | प्रतिनिधी : पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारण्यात येणार आहेत. या कामांसाठी एकूण १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या सहा ठिकाणी उभारणार बसथांबे :
१. अळकुटी
२. निघोज
३. नारायण गव्हाण
४. देवीभोयरे
५. एमआयडीसी फाटा, सुपा
६. पाडळी रांजणगाव
तालुक्यातील या सहाही ठिकाणी प्रत्येकी २० लाख रुपये खर्चून सुसज्ज बसथांबे उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) माध्यमातून ही कामे केली जाणार आहेत.
या बसथांब्यांमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना बसची प्रतीक्षा करताना निवाऱ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होण्यास मदत होईल. प्रवाशांचा प्रतीक्षेचा त्रास कमी होऊन ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक सुविधांना बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
आमदार काशिनाथ दाते यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या या निधीतून ग्रामीण भागातील प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.








