• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘आजचे रोप, उद्याचे वृक्ष’चा निर्धार; कुसूरमध्ये आवळा लागवडीसह निसर्ग संवर्धन मोहीम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘आजचे रोप, उद्याचे वृक्ष’चा निर्धार; कुसूरमध्ये आवळा लागवडीसह निसर्ग संवर्धन मोहीम
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचा पुढाकार; रोपांच्या संगोपनावर विशेष भर

येवला | प्रतिनिधी : दुष्काळी परिस्थितीतही गावातील हिरवाई टिकवून ठेवणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे, हा उद्देश समोर ठेवून ग्रामपंचायत कुसूरच्या वतीने ‘आजचे रोप, उद्याचे वृक्ष’ या संकल्पनेअंतर्गत निसर्ग संवर्धन मोहीम राबविण्यात येत आहे. येवला येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गतिमान करण्यात आला असून, यामध्ये आवळा लागवडीवर विशेष भर देण्यात येत आहे.

RelatedPosts

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भगरे कुटुंबाला कुणाल दराडे फाउंडेशनचा मदतीचा हात

अंबाजोगाई पोलिसांची तत्परता! हरवलेली २ लाख ८६ हजार ५०० रुपयांची पर्स महिलेला परत

दुष्काळी मदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

सध्या बदलते हवामान आणि कमी पावसामुळे दुष्काळाची तीव्रता जाणवत आहे. अशा परिस्थितीत केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या रोपांचे संवर्धन आणि संगोपन करणे ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर कमी पाण्यात आणि प्रतिकूल परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या आवळ्याच्या झाडांची लागवड करून गावात हरित पट्टा निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आवळा लागवडीचा हा छोटासा प्रयत्न म्हणजे उद्याच्या हिरव्यागार भविष्याची पेरणी असल्याची भावना या मोहिमेतून व्यक्त होत आहे.

या उपक्रमांतर्गत सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर, रस्त्यांच्या दुतर्फा तसेच गावातील मोकळ्या जागांवर आवळा आणि इतर स्थानिक प्रजातींच्या पूरक रोपांची लागवड करण्यात येणार आहे. ठिबक सिंचनाद्वारे रोपांना नियमित पाणीपुरवठा करून त्यांची निगा राखण्याचा निर्धारही करण्यात आला आहे.

आज लावलेली रोपे भविष्यात मोठी होऊन गावाला सावली, शुद्ध हवा, जलसंधारण आणि आरोग्यदायी फळांच्या माध्यमातून आधार देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

निसर्ग संवर्धनाच्या या लोकचळवळीत ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळे, शालेय विद्यार्थी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि लावलेल्या प्रत्येक रोपाचे जतन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Amol Khare
Previous Post

अंबाजोगाई पोलिसांची तत्परता! हरवलेली २ लाख ८६ हजार ५०० रुपयांची पर्स महिलेला परत

Next Post

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भगरे कुटुंबाला कुणाल दराडे फाउंडेशनचा मदतीचा हात

Related Posts

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भगरे कुटुंबाला कुणाल दराडे फाउंडेशनचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भगरे कुटुंबाला कुणाल दराडे फाउंडेशनचा मदतीचा हात

November 20, 2026
1
अंबाजोगाई पोलिसांची तत्परता! हरवलेली २ लाख ८६ हजार ५०० रुपयांची पर्स महिलेला परत
ताज्या घडामोडी

अंबाजोगाई पोलिसांची तत्परता! हरवलेली २ लाख ८६ हजार ५०० रुपयांची पर्स महिलेला परत

November 20, 2026
4
दुष्काळी मदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी
ताज्या घडामोडी

दुष्काळी मदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

November 20, 2026
5
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विचार विभागाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा. दत्तात्रय वाघ यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विचार विभागाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा. दत्तात्रय वाघ यांची नियुक्ती

November 20, 2026
5
तीर्थक्षेत्र कन्हैयालाल महाराज आमळी यात्रोत्सवाला शनिवारपासून भव्य सुरुवात
ताज्या घडामोडी

तीर्थक्षेत्र कन्हैयालाल महाराज आमळी यात्रोत्सवाला शनिवारपासून भव्य सुरुवात

November 20, 2026
5
एरंडोल येथे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू
ताज्या घडामोडी

एरंडोल येथे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

November 20, 2026
1
Next Post
आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भगरे कुटुंबाला कुणाल दराडे फाउंडेशनचा मदतीचा हात

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भगरे कुटुंबाला कुणाल दराडे फाउंडेशनचा मदतीचा हात

ताज्या बातम्या

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भगरे कुटुंबाला कुणाल दराडे फाउंडेशनचा मदतीचा हात

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भगरे कुटुंबाला कुणाल दराडे फाउंडेशनचा मदतीचा हात

November 20, 2026
‘आजचे रोप, उद्याचे वृक्ष’चा निर्धार; कुसूरमध्ये आवळा लागवडीसह निसर्ग संवर्धन मोहीम

‘आजचे रोप, उद्याचे वृक्ष’चा निर्धार; कुसूरमध्ये आवळा लागवडीसह निसर्ग संवर्धन मोहीम

November 20, 2026
अंबाजोगाई पोलिसांची तत्परता! हरवलेली २ लाख ८६ हजार ५०० रुपयांची पर्स महिलेला परत

अंबाजोगाई पोलिसांची तत्परता! हरवलेली २ लाख ८६ हजार ५०० रुपयांची पर्स महिलेला परत

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In