• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

‘वाद नाही, संघर्ष नाही… संवादातून मार्ग’; दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांनी प्रत्येकी ८ फूट जमीन स्वेच्छेने दिली

श्रीगोंदा | प्रतिनिधी : ‘ना वाद, ना संघर्ष… केवळ संवाद, विश्वास आणि शेतकरी हिताची प्रामाणिक भावना’ या तत्त्वातून चिखली (ता. श्रीगोंदा) येथील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला गाडेकर मळा ते झरेकर वस्ती हा १.५ किलोमीटरचा शेतपाणंद रस्ता अखेर खुला करण्यात आला आहे. गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी प्रशासकीय अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

RelatedPosts

पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे २०२५ ते जून २०३० या कालावधीसाठी आरक्षण निश्चित

अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे आणि आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच शेतपाणंद रस्ता चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम यशस्वी झाला. श्रीगोंदा उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर आणि तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली.

विशेष म्हणजे, या रस्त्यासाठी लगतच्या दोन्ही गटधारक शेतकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेत प्रत्येकी ८ फूट, असे एकूण १६ फूट क्षेत्र स्वेच्छेने उपलब्ध करून दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली.

यावेळी क्षेत्रीय समितीचे सह-अध्यक्ष दादासाहेब जंगले पाटील, श्रीगोंदा तालुका समन्वयक ॲड. गोरख कडूस पाटील, तलाठी भूषण कनगरे, बेलवंडी पोलीस ठाण्याचे राजेंद्र भोर, चिखलीचे सरपंच कुलदीप भैय्या कदम, चेअरमन गोरख झेंडे यांच्यासह ठकाजी झरेकर, बाप्पू गाडेकर, बाबा महाराज झेंडे, दत्तात्रय झेंडे महाराज, अंबादास झरेकर, ज्ञानेश्वर झेंडे, साहेबराव गाडेकर, शिवाजी झेंडे, अनिल झेंडे, गणेश झेंडे, महादेव झेंडे, संतोष झेंडे, अभिजित झरेकर आणि इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.

केवळ संवाद आणि सामंजस्यातून हा रस्ता खुला झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रस्ता उपलब्ध झाल्यामुळे शेतीमालाच्या वाहतुकीचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

Ad 1
Tags: Shrirang Salwe
Previous Post

पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

Related Posts

पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो
ताज्या घडामोडी

पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

November 20, 2026
0
पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर
ताज्या घडामोडी

पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

November 20, 2026
2
चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे २०२५ ते जून २०३० या कालावधीसाठी आरक्षण निश्चित
ताज्या घडामोडी

चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे २०२५ ते जून २०३० या कालावधीसाठी आरक्षण निश्चित

November 20, 2026
3
ताज्या घडामोडी

खुशाल ईश्वर गुट्टे यांचा भाऊसाहेब मूलक आयुर्वेदिक महाविद्यालयात गौरव

November 20, 2026
1
मेळघाटातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून रोहित श्रीपाल पाल यांचे प्रशासनाला निवेदन
ताज्या घडामोडी

मेळघाटातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून रोहित श्रीपाल पाल यांचे प्रशासनाला निवेदन

November 20, 2026
3
आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भगरे कुटुंबाला कुणाल दराडे फाउंडेशनचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या भगरे कुटुंबाला कुणाल दराडे फाउंडेशनचा मदतीचा हात

November 20, 2026
4

ताज्या बातम्या

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

November 20, 2026
पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

November 20, 2026
पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In