• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

फुलवाला चौकात महापालिकेचा जेसीबी धडाडला; अतिक्रमणांवर कारवाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
फुलवाला चौकात महापालिकेचा जेसीबी धडाडला; अतिक्रमणांवर कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

८० फुटी रोड, तिरंगा चौक आणि देवपूरमधील अतिक्रमण कधी हटवणार? नागरिकांचा प्रशासनाला सवाल

धुळे | प्रतिनिधी :

धुळे शहरातील पेठ भागात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय वाढत असल्याने महापालिकेने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी फुलवाला चौक आणि गल्ली क्रमांक चार परिसरात जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमणे हटविण्यात आली.

RelatedPosts

गरिबांच्या झोपडीत दिवाळीचा आनंद फुलवला; शारदाताई भुयार यांचा मायेचा उपक्रम

शिक्षण हक्क सत्याग्रहासाठी सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे निवेदन

आमदार अक्षय कर्डिले यांचा गुंडेगाव येथे यथोचित सन्मान

या कारवाईदरम्यान रस्त्यावर पुढे वाढवलेले अनधिकृत शेड, टपऱ्या, ओटे तसेच हातगाड्या हटविण्यात आल्या. अचानक झालेल्या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांची धावपळ उडाली. कारवाईनंतर परिसरातील रस्ते काही प्रमाणात मोकळे झाल्याने वाहतुकीला दिलासा मिळाला.

रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि हातगाड्यांमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. यासंदर्भात नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही मोहीम हाती घेतली.

यापूर्वीही प्रशासनाकडून संयुक्त अतिक्रमण निर्मूलन मोहिमा राबविण्यात आल्या होत्या. मात्र, कारवाईनंतर काही दिवसांतच अतिक्रमणधारक पुन्हा त्याच जागांवर टपऱ्या आणि हातगाड्या उभ्या करतात. त्यामुळे काही काळ रस्ते मोकळे झाल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्याचे चित्र दिसून येते.

केवळ एकदिवसीय कारवाई करून अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार नाही. अतिक्रमण पुन्हा होऊ नये, यासाठी महापालिकेने सातत्याने देखरेख आणि ठोस नियोजन करणे आवश्यक आहे.

फुलवाला चौकात महापालिकेने कारवाई केली असली तरी ८० फुटी रोड, तिरंगा चौक, देवपूर आणि शहरातील इतर भागांतील अतिक्रमणांचा प्रश्न अद्याप कायम आहे. या परिसरांतील अतिक्रमणे कधी हटविणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरातील सर्व प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करून वाहतुकीसाठी मोकळे करावेत आणि हटविलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी महापालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Ad 1
Tags: Mohit Kothari
Previous Post

गरिबांच्या झोपडीत दिवाळीचा आनंद फुलवला; शारदाताई भुयार यांचा मायेचा उपक्रम

Related Posts

गरिबांच्या झोपडीत दिवाळीचा आनंद फुलवला; शारदाताई भुयार यांचा मायेचा उपक्रम
ताज्या घडामोडी

गरिबांच्या झोपडीत दिवाळीचा आनंद फुलवला; शारदाताई भुयार यांचा मायेचा उपक्रम

November 25, 2026
2
शिक्षण हक्क सत्याग्रहासाठी सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिक्षण हक्क सत्याग्रहासाठी सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे निवेदन

November 25, 2026
3
आमदार अक्षय कर्डिले यांचा गुंडेगाव येथे यथोचित सन्मान
ताज्या घडामोडी

आमदार अक्षय कर्डिले यांचा गुंडेगाव येथे यथोचित सन्मान

November 25, 2026
6
माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
ताज्या घडामोडी

माजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत माहूरमध्ये अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

November 24, 2026
19
अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी
ताज्या घडामोडी

अकोट शहरात अतिक्रमणाचा विळखा; फेरीवाले आणि ऑटो रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

November 24, 2026
5
सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा
ताज्या घडामोडी

सुरेगाव रस्ता येथील हनुमान मंदिरात काकडा भजनाचा भक्तिमय सोहळा

November 24, 2026
35

ताज्या बातम्या

फुलवाला चौकात महापालिकेचा जेसीबी धडाडला; अतिक्रमणांवर कारवाई

फुलवाला चौकात महापालिकेचा जेसीबी धडाडला; अतिक्रमणांवर कारवाई

November 25, 2026
गरिबांच्या झोपडीत दिवाळीचा आनंद फुलवला; शारदाताई भुयार यांचा मायेचा उपक्रम

गरिबांच्या झोपडीत दिवाळीचा आनंद फुलवला; शारदाताई भुयार यांचा मायेचा उपक्रम

November 25, 2026
शिक्षण हक्क सत्याग्रहासाठी सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे निवेदन

शिक्षण हक्क सत्याग्रहासाठी सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे निवेदन

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In