• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुष्काळात फळबागा आणि पशुधन वाचवा; शिवसेनेची कृषी विभागाकडे मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
दुष्काळात फळबागा आणि पशुधन वाचवा; शिवसेनेची कृषी विभागाकडे मागणी
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

शिवार बैठका व पशुसंवर्धन मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याची मागणी; जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांचे निवेदन

माळशिरस | प्रतिनिधी :

माळशिरस तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांसमोर शेती आणि पशुधन जगविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर उजनी व वीर धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर करून फळबागा टिकविण्यासाठी गावोगावी शिवार बैठका घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच पशुधन संवर्धनाबाबत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख (ओबीसी) राजकुमार हिवरकर पाटील यांनी माळशिरसचे तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

RelatedPosts

मोती माता यात्रेपूर्वी शिरपूर–टिटंबा मार्गाची दुरुस्ती करा

पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांना पुरस्कार प्रदान

यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याचा आरोप; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा सध्या पाण्याअभावी धोक्यात आल्या आहेत. धरणातून मिळणाऱ्या पाण्याचा ठिबक सिंचनाद्वारे वापर, पाणी व्यवस्थापन, आच्छादन तंत्रज्ञान आणि कमी पाण्यात फळबागांचे संवर्धन कसे करावे, याबाबत तज्ज्ञांमार्फत प्रत्यक्ष शिवारात शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी पाणी व चाऱ्याचे नियोजन, चाऱ्याची उपलब्धता, चारा साठवणूक, पशुखाद्य व्यवस्थापन, जनावरांचे आरोग्य आणि संवर्धन याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागाने पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने गावागावांत शिबिरे आयोजित करावीत, अशी विनंती हिवरकर पाटील यांनी केली.

माळशिरस तालुका आदर्श तालुका म्हणून इतर तालुक्यांनी आणि जिल्ह्याने दखल घ्यावी, असे काम कृषी विभागाने करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

या वेळी माळशिरस तालुकाप्रमुख तानाजीराव भोळे पाटील, जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, जिल्हा संघटक बापू लोखंडे, शिवसेनेचे हेमंत चव्हाण यांच्यासह तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी, कृषी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Dinesh Jadhav
Previous Post

यावलमध्ये अंत्ययात्रा अडविल्याचा आरोप; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Next Post

पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांना पुरस्कार प्रदान

Related Posts

मोती माता यात्रेपूर्वी शिरपूर–टिटंबा मार्गाची दुरुस्ती करा
ताज्या घडामोडी

दोन वर्षांपासून पेनूर–शेवडी रस्त्याचे काम रखडले; नागरिक त्रस्त
ताज्या घडामोडी

दोन वर्षांपासून पेनूर–शेवडी रस्त्याचे काम रखडले; नागरिक त्रस्त

November 25, 2026
2
फुलवाला चौकात महापालिकेचा जेसीबी धडाडला; अतिक्रमणांवर कारवाई
ताज्या घडामोडी

फुलवाला चौकात महापालिकेचा जेसीबी धडाडला; अतिक्रमणांवर कारवाई

November 25, 2026
14
गरिबांच्या झोपडीत दिवाळीचा आनंद फुलवला; शारदाताई भुयार यांचा मायेचा उपक्रम
ताज्या घडामोडी

गरिबांच्या झोपडीत दिवाळीचा आनंद फुलवला; शारदाताई भुयार यांचा मायेचा उपक्रम

November 25, 2026
8
Next Post
पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांना पुरस्कार प्रदान

पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांना पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

मोती माता यात्रेपूर्वी शिरपूर–टिटंबा मार्गाची दुरुस्ती करा

मोती माता यात्रेपूर्वी शिरपूर–टिटंबा मार्गाची दुरुस्ती करा

November 25, 2026
पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांना पुरस्कार प्रदान

पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांना पुरस्कार प्रदान

November 25, 2026
दुष्काळात फळबागा आणि पशुधन वाचवा; शिवसेनेची कृषी विभागाकडे मागणी

दुष्काळात फळबागा आणि पशुधन वाचवा; शिवसेनेची कृषी विभागाकडे मागणी

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In