• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागवडे कारखान्याने ऊसदराचा पहिला हप्ता तातडीने द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

ओंकार ग्रुपचा जाहीर केलेला दरही अमान्य; प्रतिटन ४ हजार रुपये दराची मागणी, १ डिसेंबरपूर्वी ३,७०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा अल्टिमेटम

श्रीगोंदा | प्रतिनिधी :

यंदाचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले असतानाही नागवडे सहकारी साखर कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांना ऊसदराचा एक रुपयाही दिलेला नाही. कारखाना व्यवस्थापनाने तातडीने ऊसदर जाहीर करून प्रतिटन ३ हजार ७०० रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना अदा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, शामराव नागवडे आणि शेतकऱ्यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास कारखान्याची गव्हाण बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

RelatedPosts

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

देवदैठणच्या शाळेला पायऱ्याच नाहीत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

यासंदर्भात बोलताना हरिदास शिर्के म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रासह सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर करून शेतकऱ्यांना पहिला हप्ता अदा केला आहे. मात्र, नागवडे कारखाना व्यवस्थापनाने अद्याप ऊसदर जाहीर केलेला नाही. गाळपानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना ऊसदराचे पैसे देणे बंधनकारक असतानाही कारखान्याकडून दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

नागवडे कारखान्याने आतापर्यंत तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असूनही ऊसदराच्या बाबतीत शेतकऱ्यांना अंधारात ठेवण्यात आले आहे. जिल्हा बँकेने उत्पादित साखरेच्या प्रत्येक क्विंटल पोत्यावर ४ हजार रुपये उचल देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे कारखान्याने प्रतिटन ४ हजार रुपये दर जाहीर करावा आणि १ डिसेंबरपूर्वी प्रतिटन ३ हजार ७०० रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मागणी मान्य न झाल्यास २ डिसेंबरपासून कारखान्याच्या वेळकाढूपणाच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि कारखान्याची गव्हाण बंद पाडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, पालकमंत्री, साखर आयुक्त आणि संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.

निवेदनावर हरिदास शिर्के, शामराव नागवडे यांच्यासह योगेश मगर, नितीन जिजाबापू शिंदे, बाबासाहेब चोरमले, नितीन वाबळे आणि बाळासाहेब जाधव यांच्या सह्या आहेत. ऊसदराची अधिकृत घोषणा आणि पहिला हप्ता मिळावा, यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, ओंकार ग्रुपच्या तालुक्यातील गौरी शुगर (हिरडगाव) आणि ओंकार शुगर (देवदैठण) या कारखान्यांनी उसाला प्रतिटन ३ हजार ७०० रुपये दर देण्याची घोषणा केली आहे. मात्र, हा दर शेतकऱ्यांना मान्य नसल्याचे शिर्के, नागवडे आणि शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात आणि तालुक्यात उसासाठी एकच दरसूत्र ठरवून दर जाहीर करणे अपेक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ओंकार ग्रुपनेही प्रतिटन ४ हजार रुपये दर जाहीर करून पहिला हप्ता ३ हजार ७०० रुपये द्यावा; अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिर्के, नागवडे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला आहे.

Ad 1
Tags: Shrirang Salwe
Previous Post

देवदैठणच्या शाळेला पायऱ्याच नाहीत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Next Post

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

Related Posts

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप
ताज्या घडामोडी

2
देवदैठणच्या शाळेला पायऱ्याच नाहीत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
ताज्या घडामोडी

देवदैठणच्या शाळेला पायऱ्याच नाहीत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

November 25, 2026
1
मोती माता यात्रेपूर्वी शिरपूर–टिटंबा मार्गाची दुरुस्ती करा
ताज्या घडामोडी

मोती माता यात्रेपूर्वी शिरपूर–टिटंबा मार्गाची दुरुस्ती करा

November 25, 2026
5
पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांना पुरस्कार प्रदान
ताज्या घडामोडी

पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळांना पुरस्कार प्रदान

November 25, 2026
5
दुष्काळात फळबागा आणि पशुधन वाचवा; शिवसेनेची कृषी विभागाकडे मागणी
ताज्या घडामोडी

दुष्काळात फळबागा आणि पशुधन वाचवा; शिवसेनेची कृषी विभागाकडे मागणी

November 25, 2026
5
Next Post
ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

ताज्या बातम्या

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

November 25, 2026
ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

November 25, 2026

नागवडे कारखान्याने ऊसदराचा पहिला हप्ता तातडीने द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In