• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुऱ्हा येथे पारंपरिक रिंगण सोहळा उत्साहात; आमदार राजेश वानखडे यांची पत्नी आरती वानखडे यांच्यासह उपस्थिती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
कुऱ्हा येथे पारंपरिक रिंगण सोहळा उत्साहात; आमदार राजेश वानखडे यांची पत्नी आरती वानखडे यांच्यासह उपस्थिती
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठलनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला; वारकरी बांधवांसोबत आमदारांनीही घेतला रिंगण सोहळ्यात सहभाग

तिवसा | प्रतिनिधी :

कौंडण्यपूर येथे प्रस्थान करणाऱ्या पालख्या व दिंड्यांचा पारंपरिक रिंगण सोहळा कुऱ्हा येथे मंगळवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांनी पत्नी सौ. आरती वानखडे यांच्यासह उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले. तसेच वारकरी बांधवांसोबत रिंगण सोहळ्यात सहभाग नोंदविला.

RelatedPosts

हेळंब येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

प्रतिज्ञांचे पुनर्स्मरण आणि आध्यात्मिक विकासाचा दृढ संकल्प; हिंगणघाट येथे मित्र पुनर्निश्चय सोहळा उत्साहात

हरपवडे येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे भव्य दुर्ग बांधणी स्पर्धेचे आयोजन

दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध गावांतील पालख्या आणि दिंड्या कुऱ्हा येथे दाखल झाल्या होत्या. टाळ-मृदंगाचा गजर, भजन-कीर्तन आणि विठ्ठलनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वारकऱ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे पारंपरिक सोहळ्याला विशेष रंगत आली.

आमदार राजेश वानखडे आणि सौ. आरती वानखडे यांनी वारकरी बांधवांची भेट घेतली. पालखीचे दर्शन घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रती आदर व्यक्त केला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या या सोहळ्यात सहभागी होत त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला.

या सोहळ्यास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, महिला, युवक तसेच वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालख्या व दिंड्यांनी कौंडण्यपूर यात्रेकडे प्रस्थान केले.

Ad 1
Tags: Manish Mahore
Previous Post

प्रतिज्ञांचे पुनर्स्मरण आणि आध्यात्मिक विकासाचा दृढ संकल्प; हिंगणघाट येथे मित्र पुनर्निश्चय सोहळा उत्साहात

Next Post

हेळंब येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

Related Posts

हेळंब येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता
ताज्या घडामोडी

हेळंब येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

November 25, 2026
6
प्रतिज्ञांचे पुनर्स्मरण आणि आध्यात्मिक विकासाचा दृढ संकल्प; हिंगणघाट येथे मित्र पुनर्निश्चय सोहळा उत्साहात
ताज्या घडामोडी

प्रतिज्ञांचे पुनर्स्मरण आणि आध्यात्मिक विकासाचा दृढ संकल्प; हिंगणघाट येथे मित्र पुनर्निश्चय सोहळा उत्साहात

November 25, 2026
6
हरपवडे येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे भव्य दुर्ग बांधणी स्पर्धेचे आयोजन
ताज्या घडामोडी

हरपवडे येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे भव्य दुर्ग बांधणी स्पर्धेचे आयोजन

November 25, 2026
2
लोह्यात देशपिता लहुजी साळवे जयंती व महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
ताज्या घडामोडी

लोह्यात देशपिता लहुजी साळवे जयंती व महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

November 25, 2026
4
सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप
ताज्या घडामोडी

सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप

November 25, 2026
3
ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर
ताज्या घडामोडी

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण कारखान्यांचा ऊसदर प्रतिटन ३,७०० रुपये जाहीर

November 25, 2026
14
Next Post
हेळंब येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

हेळंब येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

ताज्या बातम्या

हेळंब येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

हेळंब येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता

November 25, 2026
कुऱ्हा येथे पारंपरिक रिंगण सोहळा उत्साहात; आमदार राजेश वानखडे यांची पत्नी आरती वानखडे यांच्यासह उपस्थिती

कुऱ्हा येथे पारंपरिक रिंगण सोहळा उत्साहात; आमदार राजेश वानखडे यांची पत्नी आरती वानखडे यांच्यासह उपस्थिती

November 25, 2026
प्रतिज्ञांचे पुनर्स्मरण आणि आध्यात्मिक विकासाचा दृढ संकल्प; हिंगणघाट येथे मित्र पुनर्निश्चय सोहळा उत्साहात

प्रतिज्ञांचे पुनर्स्मरण आणि आध्यात्मिक विकासाचा दृढ संकल्प; हिंगणघाट येथे मित्र पुनर्निश्चय सोहळा उत्साहात

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In