• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देशमुखवाडीत संविधान दिन उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
देशमुखवाडीत संविधान दिन उत्साहात साजरा
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

ग्रामपंचायत कार्यालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन; नागरिकांनी घेतली संविधान मूल्यांच्या पालनाची शपथ

देशमुखवाडी, ता. माळशिरस | प्रतिनिधी :

भारतीय संविधानाला २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकृती मिळाल्याच्या ऐतिहासिक दिनानिमित्त देशमुखवाडी ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी संविधान दिन साजरा करण्यात आला.

RelatedPosts

घाटघर येथे दहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन उत्साहात संपन्न

दोंडाईच्यात ‘ऑरेंज द वर्ल्ड’ अभियानातून महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती

तब्बल ४२ वर्षांनंतर चांबळीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेच्या आठवणींना उजाळा

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी नाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर उपस्थितांनी उभे राहून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. ‘आम्ही भारताचे लोक…’ या शब्दांनी ग्रामपंचायत कार्यालय परिसर दुमदुमून गेला.

या कार्यक्रमाला सरपंच प्रतिभा अविनाश देशमुख, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी शिक्षिका आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी ग्रामविकास अधिकारी नाळे यांनी संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले. संविधान हे प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा आधार असून, त्यातून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये मिळाली आहेत. नागरिकांनी आपले हक्क जाणून घेण्याबरोबरच कर्तव्यांचेही पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सरपंच प्रतिभा अविनाश देशमुख यांनी गावात संविधानातील तत्त्वांनुसार पारदर्शक आणि सर्वसमावेशक कारभार करण्याचा संकल्प व्यक्त केला. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी संविधानाचे रक्षण करण्याची आणि त्यातील मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. ग्रामपंचायत कर्मचारी तानाजी धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर रोजगार सेवक शिवाजी गाडे यांनी आभार मानले.

Ad 1
Tags: Dinesh Jadhav
Previous Post

घाटघर येथे दहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन उत्साहात संपन्न

Related Posts

घाटघर येथे दहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

घाटघर येथे दहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन उत्साहात संपन्न

November 26, 2026
1
दोंडाईच्यात ‘ऑरेंज द वर्ल्ड’ अभियानातून महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती
ताज्या घडामोडी

दोंडाईच्यात ‘ऑरेंज द वर्ल्ड’ अभियानातून महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती

November 26, 2026
2
तब्बल ४२ वर्षांनंतर चांबळीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेच्या आठवणींना उजाळा
ताज्या घडामोडी

तब्बल ४२ वर्षांनंतर चांबळीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेच्या आठवणींना उजाळा

November 26, 2026
35
सावद्यात दिवाळीनिमित्त गरीब व गरजू कुटुंबांना शिवसेनेतर्फे शिधावाटप
ताज्या घडामोडी

सावद्यात दिवाळीनिमित्त गरीब व गरजू कुटुंबांना शिवसेनेतर्फे शिधावाटप

November 26, 2026
11
फैजपूरमध्ये स्वयंभू भगवान पांडुरंग रथोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

फैजपूरमध्ये स्वयंभू भगवान पांडुरंग रथोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा

November 26, 2026
5
शिक्षक संजयकुमार वाळके यांना ‘शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
ताज्या घडामोडी

शिक्षक संजयकुमार वाळके यांना ‘शिक्षण महर्षी आदर्श शिक्षक’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

November 26, 2026
5

ताज्या बातम्या

देशमुखवाडीत संविधान दिन उत्साहात साजरा

देशमुखवाडीत संविधान दिन उत्साहात साजरा

November 26, 2026
घाटघर येथे दहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन उत्साहात संपन्न

घाटघर येथे दहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन उत्साहात संपन्न

November 26, 2026
दोंडाईच्यात ‘ऑरेंज द वर्ल्ड’ अभियानातून महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती

दोंडाईच्यात ‘ऑरेंज द वर्ल्ड’ अभियानातून महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती

November 26, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In