• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक व अवजड वाहनांना नवीन मार्गावर बंदी घालण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक व अवजड वाहनांना नवीन मार्गावर बंदी घालण्याची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

सीताबाई पटवर्धन हायस्कूल ते श्री दत्त महाविद्यालय मार्गावर वाहतुकीचा ताण; जुना रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत पोलिस आणि नगरपालिकेला निवेदन

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरातील सीताबाई पटवर्धन हायस्कूल ते श्री दत्त महाविद्यालय या नवीन डांबरी रस्त्यावरून सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. साखर कारखाने सुरू झाल्याने या मार्गावरून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाड्या तसेच डंपर, कंटेनर आणि ट्रक यांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी ऊस वाहतूक आणि अवजड वाहनांना या रस्त्यावरून येण्यास मज्जाव करावा, अशी मागणी कुरुंदवाड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

RelatedPosts

लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत चिचखेडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी

तडेगाव जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा

या मागणीसंदर्भात कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांना निवेदन देण्यात आले. कुरुंदवाड शहर भाजपचे प्रमुख अरुण नाईक यांनी याबाबत माहिती दिली.

सीताबाई पटवर्धन हायस्कूल ते श्री दत्त महाविद्यालय हा मार्ग टाकळी, राजापूर, खिद्रापूर, दत्तवाड आणि दानवाडमार्गे कर्नाटकात जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरला जातो. तसेच मजरेवाडीकडून येणारा जुना रस्ता लक्ष्मी बेकरीजवळ या मार्गाला मिळतो. जुना रस्ता रुंद असूनही त्यावरून तुलनेने कमी वाहतूक होते; तर नवीन डांबरी रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या मार्गावर शाळा, महाविद्यालय, बँका, एमएससीबी कार्यालय, कुरुंदवाड पोलीस ठाणे, लायन्स क्लब, नेत्र रुग्णालय, दंत रुग्णालय, ग्रामीण सेवा केंद्रे, पाटबंधारे कार्यालय, जनावरांचा दवाखाना, साखर कारखान्यांची विभागीय कार्यालये, गॅस कार्यालय आणि ग्राहक बाजार यांसह विविध आस्थापना आहेत. त्यामुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि शालेय विद्यार्थी यांची या मार्गावरून सतत ये-जा असते.

साखर कारखाने सुरू झाल्यानंतर ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाड्या आणि इतर अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सीताबाई पटवर्धन हायस्कूल ते श्री दत्त महाविद्यालय या नवीन रस्त्यावरून ऊस वाहतूक आणि अवजड वाहनांची वाहतूक बंद करून मजरेवाडीकडून लक्ष्मी बेकरीकडे येणारा जुना रस्ता या वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देताना सुदर्शन माळी, स्वप्नील श्रीधनकर, संतोष गायकवाड, ॲड. महेश जोशी, दिनेश पटेल, दिलीप पटेल, दिनकर शितोळे, राजाराम कनेरे, मुकुंद पाटील आदी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता

Related Posts

लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता
ताज्या घडामोडी

लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता

November 27, 2026
1
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत चिचखेडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत चिचखेडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 27, 2026
3
तडेगाव जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

तडेगाव जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन साजरा

November 27, 2026
4
आमदार निधीतून उभारलेल्या नागज बसस्थानकाची दुरवस्था; मद्यपींचा अड्डा बनल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

आमदार निधीतून उभारलेल्या नागज बसस्थानकाची दुरवस्था; मद्यपींचा अड्डा बनल्याचा ग्रामस्थांचा आरोप

November 27, 2026
1
राहेरी बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
ताज्या घडामोडी

राहेरी बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

November 27, 2026
2
विद्युत तारांच्या ठिणग्यांमुळे उमरी बु. शिवारात एक एकर ऊस जळून खाक
ताज्या घडामोडी

विद्युत तारांच्या ठिणग्यांमुळे उमरी बु. शिवारात एक एकर ऊस जळून खाक

November 27, 2026
8

ताज्या बातम्या

कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक व अवजड वाहनांना नवीन मार्गावर बंदी घालण्याची मागणी

कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक व अवजड वाहनांना नवीन मार्गावर बंदी घालण्याची मागणी

November 27, 2026
लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता

लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता

November 27, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत चिचखेडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत चिचखेडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 27, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In