• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुष्काळात धाराशिव जिल्ह्यातील ६७ हजार ८०० रेशन लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
दुष्काळात धाराशिव जिल्ह्यातील ६७ हजार ८०० रेशन लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

उत्पन्न मर्यादेत बदल आणि रेशन पूर्ववत सुरू करण्याची मागणी; सात दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा

धाराशिव | प्रतिनिधी :

धाराशिव जिल्हा दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना जिल्ह्यातील तब्बल ६७ हजार ८०० रेशन लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद करण्यात आल्याचा मुद्दा समोर आला आहे. यासंदर्भात सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते राजकुमार प्रल्हाद तूपसौंदरे (रा. माळकरंजा, ता. कळंब) यांनी २४ नोव्हेंबर २०२६ रोजी ई-मेलद्वारे जिल्हाधिकारी, राज्य शासन आणि महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाकडे निवेदन व तक्रार दाखल केली आहे. सात दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास जनआंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

RelatedPosts

संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर

अहिल्यानगरच्या ऊस उत्पादकांना प्रतिटन ३,४५० रुपये दर जाहीर

या निवेदनाची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी २५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

ग्रामीण भागातील प्राधान्य कुटुंब (PHH) योजनेसाठी लागू असलेली वार्षिक ४४ हजार रुपयांची उत्पन्न मर्यादा २५ ते ३० वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आली असल्याचा मुद्दा तूपसौंदरे यांनी निवेदनात मांडला आहे. २०२६ मधील महागाई आणि रुपयाची क्रयशक्ती लक्षात घेता ही मर्यादा कालबाह्य झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना रोजगार मिळण्यात अडचणी येत असताना जुन्या उत्पन्न निकषांमुळे गरीब कुटुंबांचा धान्यपुरवठा बंद होणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. हा प्रकार संविधानातील कलम २१ अंतर्गत जगण्याच्या अधिकाराशी संबंधित असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या

  • बंद करण्यात आलेल्या सर्व ६७ हजार ८०० लाभार्थ्यांचा रेशन कार्ड व धान्यपुरवठा कोणतीही अट किंवा छाननी न लावता तातडीने पूर्ववत सुरू करावा.
  • बंद झालेल्या लाभार्थ्यांची तालुका आणि गावनिहाय यादी बंद करण्याच्या नेमक्या कारणांसह सार्वजनिक करावी.
  • नवीन शासन निर्णय होईपर्यंत जिल्ह्यात सद्यस्थिती कायम ठेवण्याचे आदेश लागू करावेत.
  • महागाईनुसार उत्पन्न मर्यादेत सुधारणा करावी आणि दाखल्यांची जाचक अट रद्द करावी.

२४ नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा विभागाने २५ नोव्हेंबर रोजी धाराशिव, तुळजापूर, लोहारा, उमरगा, कळंब, वाशी, परंडा आणि भूम येथील तहसीलदारांना पत्र पाठविले आहे. लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करणे आणि रेशन कार्ड पूर्ववत करण्याच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करून अर्जदाराला कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निवेदनातील काही महत्त्वाचे मुद्दे शासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच तूपसौंदरे यांनी उपोषणाचा मार्ग न स्वीकारता प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, पुढील सात दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन किंवा आमरण उपोषण करण्याचा इशारा तूपसौंदरे यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रेशन लाभार्थ्यांच्या धान्यपुरवठ्याचा प्रश्न आणि प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Rajkumar Tupsamudre
Previous Post

अहिल्यानगरच्या ऊस उत्पादकांना प्रतिटन ३,४५० रुपये दर जाहीर

Next Post

कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर

Related Posts

संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
ताज्या घडामोडी

5
जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुतीच्या सहकार पॅनलचा मतदार मेळावा
ताज्या घडामोडी

जिल्हा बँक निवडणुकीसाठी महायुतीच्या सहकार पॅनलचा मतदार मेळावा

November 27, 2026
4
कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक व अवजड वाहनांना नवीन मार्गावर बंदी घालण्याची मागणी
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये ऊस वाहतूक व अवजड वाहनांना नवीन मार्गावर बंदी घालण्याची मागणी

November 27, 2026
65
लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता
ताज्या घडामोडी

लिंगा कोतवाल येथे कार्तिक महिन्याची भक्तिमय वातावरणात सांगता

November 27, 2026
1
Next Post
कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर

कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

November 27, 2026
कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर

कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर

November 27, 2026
दुष्काळात धाराशिव जिल्ह्यातील ६७ हजार ८०० रेशन लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद

दुष्काळात धाराशिव जिल्ह्यातील ६७ हजार ८०० रेशन लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद

November 27, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In