बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया शाखा तिवसाचा उपक्रम; संविधानिक मूल्यांच्या जतनाचा संकल्प
तिवसा | प्रतिनिधी :
भारतीय संविधान दिनानिमित्त बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, शाखा तिवसा यांच्या वतीने गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.१५ वाजता तिवसा येथील वार्ड क्रमांक ८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये अधिष्ठित असलेले संविधान दिले. त्यांच्या कार्याचे स्मरण करून संविधानिक मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाला बहुजन विचारवंत रमेश बोरिकर, सुगत खाकसे, संदीप चक्रनारायण, सुभाष खाकसे, मुकुंद कठाणे, अमोल मेश्राम, विनोद विघ्ने, ॲड. निलेश गजबे, विलास मेश्राम, राजेश ठवरे, बाबाराव शेंडे, वंश कठाणे, लता कठाणे, सुचिता मात्रे, शीला दहीवडे यांच्यासह फेडरेशनचे कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करून संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये समाजात रुजविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.











