मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; रेल्वे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार
प्रतिनिधी :
भुसावळ ते नागपूरदरम्यान नवीन एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांची मागणी मान्य करून हा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या नवीन रेल्वेसेवेला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.
नवीन भुसावळ-नागपूर एक्स्प्रेसमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होण्यास मदत होईल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
या निर्णयामुळे भुसावळ आणि नागपूरदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











