सी.डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर येथे आज रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे JEE / NEET / MH-CET परीक्षा संदर्भातील मार्गदर्शन शिबीर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. चंद्रकांतजी दळवी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. ह्या शिबिराला रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले.
यावेळी संस्थेमार्फत अनुदानित / विना अनुदानित / स्वयं अर्थसहाय्यीत तत्वावर सुरु असलेल्या उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन विज्ञान विभागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना JEE, NEET व MH-CET सारख्या परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासंदर्भात प्राचार्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन मा. भगीरथजी शिंदे, सचिव मा. विकासजी देशमुख साहेब, संघटक मा. अनिलजी पाटील साहेब, उपाध्यक्ष मा. अरुणजी कडू पा., मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मा.सौ. मीनाताई जगधने, मा.दादाभाऊजी कळमकर, मा. राहुलजी जगताप, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, साताराचे कुलगुरू मा.डॉ. ज्ञानदेवजी म्हस्के, मा. विवेकजी वेलणकर, मा. हरिषजी बुटले, मा.डॉ. शिवलिंगजी मेनकुदळे, मा. बी.एन. पवार, मा. नवनाथजी बोडखे आदींसह उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
Discussion about this post