

भूम::; आज गोलाई चौक भूम येथे संध्याकाळी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या वतीने काल झालेल्या हरियाणा येथील दणदणीत विजयाबद्दल विजय उत्सव साजरा करण्यात आला. सलग तीन वेळेस भारतीय जनता पार्टीने हरियाणा येथे एकतर्फी सत्ता मिळवलेली आहे त्याच धर्तीवर येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष मिळून सत्ता स्थापन करणार असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये होता यावेळी 21 आदल्या व फटाक्यांच्या माळा अशी आतीशबाजी करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील,भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे
मराठवाडा सदस्य सचिन बारगजे ,भारतीय जनता पार्टीचे तालुका चिटणीस संतोष सुपेकर ,भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, भारतीय जनता पार्टीचे भूम शहराध्यक्ष बाबासाहेब विर ,एडवोकेट संजय शाळू ,उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष गवळी ,ज्येष्ठ पत्रकार शंकर खामकर शांतीराज बोराडे, सुजित वेदपाठक यांच्यासह मानकेश्वर गावचे भाजप कार्यकर्ते व भूम शहरातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चाचे मराठवाडा सदस्य सचिन बारगजे यांनी सांगितले की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाची महाराष्ट्रात सत्ता येणार आहे शेतकऱ्यांच्या विकासासाठी तसेच गोरगरीब जनतेच्या विकासासाठी हरियाणा मध्ये मिळालेल्या विजयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाची सत्ता आणायची त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मनोगत श्री बारगजे यांनी व्यक्त केले.
Discussion about this post