नांदाफाटा प्रतिनिधी =-. शासनाच्या माझी वसुंधरा स्पर्धेत ग्रामपंचायतीनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन गाव विकासात हातभार लावावा सदर अभियान ग्रामविकासासाठी प्रेरणादायी असल्याचे मत कोरपना पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी विजय पेंदाम यांनी व्यक्त केले. कोरपणा पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते .
4.0 माझी वसुंधरा स्पर्धेत तालुक्यांतील नांदा व कुकुटसात ग्रामपंचायतीने 15 लाख रुपयाचे बक्षीस पटकाविले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नांदा ग्रामपंचायतचे उपसरपंच पुरुषोत्तम आसवले स्मार्ट ग्राम बिबी चे उपसरपंच आशिष देरकर बाखरडी येथिल सरपंच अरुण रागीट सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप आदी प्रामुख्याने उपस्थित होते गावाच्या विकासात माझी वसुंधरा अभियानातून अनेक कामे करता येत
असून प्रामुख्याने वसुंधरेच्या संरक्षणासाठी भूमी जल वायू अग्नी आकाश या पंचतत्वाचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचेही पेंदाम म्हणाले गावागावात या अभियानांतर्गत ग्रामस्वच्छता घनकचरा व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन गांडूळ खत व्यवस्थापन कंपोस्ट खत आदींसह वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन इत्यादी कामांना चालना देता येते 0.4 या माजी वसुंधरा उपक्रमात कल्पना तालुक्यातील जवळपास 20 ग्रामपंचायतीने सहभाग घेतला यापुढील 0.5 अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभाग घ्यावा असे
आवाहन संवर्ग विकास अधिकारी विजय पेंदाम यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे संचालन पंचायत विस्तार अधिकारी पंढरी गेडाम यांनी केले. सुजन यावेळी गीत गायन कार्यक्रमातून अनेकांनी रसिकांची मने जिंकली कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Discussion about this post