*गजानन पाटील चव्हाण…नायगाव तालुका प्रतिनिधी…दिपक गजभारे घुंगराळेकर…दिनांक 08/10/2024 रोजी मां जिल्हाधिकारी नांदेड यांना सखोल चर्चा करून निवेदन देत असताना मागणी केली महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर विभागातील 14 चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या व मागील समाविष्ट असलेल्या अशा दोन्ही एपीएल (शेतकरी) शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 माहे मार्च 2023 अन्नधान्य ऐवजी प्रति महा प्रती लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेची थेट हस्तांतरणाची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी झाली होती
सदर माहे एप्रिल 2023 ते जुलै 2024 पर्यंत अद्याप अन्नधान्य ऐवजी प्रति माहा प्रति व्यक्ती 150 रुपये प्रमाणे एकूण सोळा ते वीस महिन्याचे कुटुंबनिहाय रोख रकमेची थेट अकाउंट मध्ये जमा विना विलंब लाभधारकांच्या अकाउंट मध्ये करावेत,कारण नायगाव उमरी धर्माबाद मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील तमाम शेतकरी कामगार मजदूर बांधव भूमिहीन असणारा सर्व शेतकरी बांधव हे योजनेमध्ये आहे आणि त्यांना त्यांच्या हक्कापासून कोसो दूर आपण ठेवत आहोत
आणि कुटुंब चालवण्यासाठी त्यांच्या हाताला काम देखील मिळत नाही आणि संबंधित प्रशासन वेळेवर काम करत नसल्याने हा विलंब झाला आहे..या सर्व शिधापत्रिका धारक शेतकरी यांना एक तर अन्न दिले पाहिजे नसेल तर त्यांच्या अकाउंटला तात्काळ पैसे जमा केले पाहिजे म्हणून संबंधित सर्व जबाबदार प्रशासनांना वतक्रारी निवेदन दिले आहे तात्काळ एपीएल शेतकरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये तात्काळ रोख रक्कम टाकण्यात यावी तसेच बीगर शेती असणाऱ्या कार्डधारकांना सर्व बांधवांना प्राधान्य कुटुंब योजने मध्ये वर्ग करण्यात यावे
अन्यथा नाईलाजस्तव जिल्हाधिकार्यालय येथे तमाम एपीएल धारक सर्व शेतकरी कामगार मजदूर बांधव आपल्या कार्यालया समोर भीक मागणेन असे आंदोलन करण्याचे ठरले आहे, यावेळी नायगाव मतदारसंघाचे युवा नेते गजानन शंकराव पा. चव्हाण, नायगाव शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन रामराव पा. तमलुरे, अतुल पा मगरूळे, अनंत मुदखेडे, किशोर महाराज धर्माबादकर आदि सह उपस्थित होते….
Discussion about this post