प्रवीण इंगळे —उमरखेड तालुका प्रतिनिधी मो, 7798767266महाराष्ट्र सरकारने राज्यातील साखर कारखान्यांना १५ नोव्हेंबर नंतर गाळपास सुरुवात करण्याचे आदेश साखर कारखान्यांना दिले असून त्यामुळे ऊस उत्पादक व ऊस वाहतूकदार यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे.
त्यामुळे ऊस गळफास १५ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र सरकार व साखर आयुक्त यांनी मान्यता द्यावी या मागणीसाठी आग्रही भूमिका घेत उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व साखर आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार असून,
उमरखेड व महागाव तालुक्यातील ऊस उत्पादक तसेच ऊस वाहतूकदार यांनी १० ऑक्टोंबर २०२४ गुरुवार रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आले.
– – – – – – – – – – – – – – – – -चौकट :- गाळपास विलंब झाल्यास उसाचे वजन घटणार तसेच रब्बी हंगाम शेतकऱ्याच्या हातातून जाणारउन्हाची तीव्रता वाढत गेल्याने ऊस कामगार शेतकऱ्यांना ऊसतोडी साठी त्रास देणार ऊसाला जाळ लावून तोडणार तसेच वाढीव पैशाची मागणी करणारपुरामुळे ऊस क्षतीग्रस्त झाला असून त्यावर लोकरी कीड व पिवळ्या रंगाचा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून
तो अधिकच वाढत जाणारऊस वाहतूकदारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणारगाळप लांबल्यास ऊसतोड कामगार तेलंगणा राज्यात कापूस वेचणीसाठी जाणार त्यामुळे ऊसतोडीवर परिणाम होणार
Discussion about this post