फुलंब्रीत अग्निशामक यंत्रणा लवकरच होणार कार्यान्वित
फुलंब्री / प्रतिनिधी:अमोल कोलते
शहरात नगर पंचायत तर्फे अग्निशामक दल कार्यान्वित करण्यात येत असून त्या अनुषंगाने बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या निर्माण कार्याचे भुमिपुजन 12 आक्टोंबर रोजी विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर ज्येष्ठ समाजसेवक नफीस पटेल यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उत्तम ढोके यांची उपस्थिति होती. सदर भुमिपुजन फुलंब्री नगर पंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी ऋषीकेश भालेराव यांच्या माध्यमातून शहरातील नागरीकां तर्फे करण्यात आले आहे.
सदरील अग्निशमन दलाच्या यंत्रणेला मार्च २०२४ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे ही यंत्रणा उभारण्यासाठी लागणारा १ कोटी ६४ लाख ५८ हजार रुपयांचा निधी नगरपंचायतीला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे शहरातील गट क्रमांक 332 मधील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र जवळ एक एकर जागेवर कार्यान्वित केल्या जाणाऱ्या या यंत्रणेच्या कामाचे भुमिपुजन विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे या वेळी फुलंब्री परिवर्तन आघाडीचे नेते अजय गंगावणे, इमरान खान, इस्माईल खान, अकबर शहा, वसिम पटेल, बशिरोद्दीन चिस्ती, जमाल शेख, अकबर पटेल, जावेद खान, बबलु सय्यद, रियाज शहा, आसेफ शेख,संतोष गरसोळे, सह इतर नागरिक उपस्थित होते.
अखेर प्रयत्नाला यश…
फुलंब्री शहर व तालुक्यात दरवर्षी किमान ८ ते १० विविध ठिकाणी आगीच्या घटना घडतात. या घटना घडल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करावे लागते. तोपर्यंत आगीत मोठे नुकसान होते. वेळप्रसंगी जीवितहानी होते. फुलंब्री शहरात अग्निशमन दल यंत्रणा गरजेची आहे अशी मागणी जोर धरत होती तसेच याबाबत फुलंब्री परिवर्तन आघाडीने नगर पंचायत ला अवगत करून पाठ पुरावा केला सदरील प्रकरणाची प्रशासक तथा मुख्याधिकारी ऋषीकेश भालेराव यांनी गांभीर्याने दखल घेत बर्याच वर्षांपासून प्रलंबित पडलेल्या प्रस्तावाला शासनाच्या निदर्शनास आणून व योग्य ते प्रयत्न करुन अखेर शहर व तालुक्यातील नागरीकांसाठी अग्निशामक यंत्रणा मंजूर करुन यश मिळविले ज्याचे कौतुक शहरातील सामान्य नागरिकां कडुन होत आहेत.
Discussion about this post