(नांदेड प्रतिनिधी ) मागील आठ-दहा दिवसांपासून किनवट तालुक्यात पावसाचे थैमान सुरू आहे. काही महसुली मंडळात तर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊन खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले.
या पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली. या नुकसानीची तात्काळ दखल घेत आ. भीमराव केराम यांनी किनवट व माहूरच्या
तहसीलदाराला पत्र देऊन नुकसान बाधित शेती क्षेत्रासह पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून आपत्कालीन सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून किनवट शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस बरसत आहे. काही महसुली मंडळात वादळी वाऱ्यासह
मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत तर अनेक घरांची पडझड झाली आहे.
या संदर्भात नुकसान बाधित शेतकऱ्यांना तसेच पडझड झालेल्या कुटुंबियांना शासनाचे अर्थसहाय्य मिळवून देण्याच्या हेतूने आ. भीमराव केराम यांनी किनवट
व माहूरच्या तहसीलदारांना पत्र दिले असून आपद्ग्रस्त शेती क्षेत्रातील पिकांची तसेच पडझडं झालेल्या घरांची महसूल व कृषी कर्मचाऱ्यामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत तसेच आपत्कालीन सर्वतोपरी शासन मदत बाधितापर्यंत पोहोचविण्यासाठी तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना आ. भीमराव केराम यांनी केल्या आहेत.
Discussion about this post