
शेतकऱ्यांना मिळणार शेतरस्ता; जिल्ह्यातील १९९७ पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी
दिवटे प्रतिनिधी :-(दि.८)
बोधेगाव :माताेश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ता याेजनेंतर्गत शेत रस्त्याचे जाळे उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात २०२१ पासून आत्तापर्यंत १९९७ कामांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत असून शेतकऱ्यांना शेतरस्ता मिळणार आहे.
रस्त्यांची माेठी दुरवस्था.
या याेजनेंतर्गत रस्त्यांचे जाळे उभारणे गरजेचे आहे. शेताकडे जाणाऱ्या रस्त्यांची माेठी दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागताे. शेतीमालाची वाहतूकही करता येत नसल्याने माेठे नुकसान हाेत असते. त्यामुळे शेतकऱ्यांची हाेणारी गैरसाेय या याेजनेद्वारे दूर हाेत आहे.
जिल्ह्यात २०२१ ते २०२४ मध्ये १९९७ रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ग्रामपंचायतीमार्फत १३४१ कामे हाेणार आहेत. तर ५२८ कामे सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण करणार आहे. यातील २३० कामे ग्रामपंचायत स्तरावरून काेणत्या यंत्रणामार्फत करायची हे ठरवणे बाकी आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
Discussion about this post