
आज दिनांक 14 ऑक्टोबर 2024 वार सोमवार ऑर्किड स्कूल,सिडको वाळूज येथे केंद्रप्रमुख आयोजित ऑनलाईन कामकाज आढावा बैठक दरम्यान नवनियुक्त केंद्रप्रमुख यांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.
तसेच आर . पी.पांचाळ गंगापूर पंचायत समिती समन्वयक यांनीही प्रत्यक्षकृती udise portal भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी व उपाय सांगितले, प्रभारी केंद्रप्रमुख यांनीही इतर ऑनलाईन उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान वाळूज केंद्राचे नवीन नियुक्त केंद्रप्रमुख श्री डी.एम.पवार सर यांचे यशश्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच स्पिरिट इंटरनॅशनल आर्ट कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज सिडको वाळूज महानगर 1, तर्फे मुख्याध्यापक लक्ष्मण हिवाळे यांचेकडून स्वागत करण्यात आले.
व पुढील कार्यासाठी शुभेच्या दिल्या…
प्रसंगी जी.प.वाळूज केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री.काद्री व इतर बहुसंख्य मुख्याध्यापक उपस्थित होते…
तसेच पुढील नियोजित बैठकीस सर्व मुख्याध्यापकांनी आवरजून उपस्थित राहावे असे आव्हान केंद्रप्रमुख श्री. डी . एम.पवार यांनी केले…
Discussion about this post