विहिरगांव प्रतिनिधी – रजत चांदेकर
वडकी पोलिस स्टेशनच्या पोलिस वसाहत मध्ये अनेक वर्षांची परंपरा जपत यावर्षीही पोलिस बांधव परीवारांनकडुन नवरात्रउत्सवात दुर्गामातेची स्थापना केली होती .सतत कुठल्याही बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलिस बांधवांनी सतत नव दिवस भड्यांऱ्यांचे आयोजन केले होते.
दिनांक १६/१०/२४ रोजी दुर्गामाता विसर्जनाची परवानगी असल्याने वडकी पोलिस स्टेशनच्या सर्व पोलिस अधिकारी, जमादार, पोलिस, महिला पोलिस, होमगार्ड यांनी वडकी गावातील प्रमुख मार्गानी ढोल ताश्याच्या गजरात भक्तीमय वातावरणात दुर्गामातेची शोभायात्रा काढुनी जड अंतःकरणाने दिला निरोप.
Discussion about this post