१५/१०. निपाणी, ता. कळंब. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त विद्या विकास विद्यालय निपाणी. येथे वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन मुख्याध्यापिका पाटील एस. पी. मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.प्रथम अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्री चौधरी सर यांनी मुलांना वाचनाचे महत्त्व सांगत, वाचनाचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व पटवून दिले. तसेच विविध उदाहरणे देवून वाचनाचे फायदे सांगितले.
यावेळी मुलांनी ग्रंथालयातील वेगवेगळी पुस्तके वाचण्याचा आनंद घेतला. यामध्ये गोष्टी, कादंबरी, कविता, पटकथा यांचे वाचन केले. याच्या माध्यमातून मुलांच्या प्रकट वाचनाला चालना मिळाली.
तसेच शालेय पोषण आहार विभाग प्रमुख श्री गवळी सर यांनी मुलांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवत उत्तम आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली, आभार प्रदर्शन श्री कनकावाड सर यांनी केले.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
राजकुमार गुंड
धाराशिव जि. प्रतिनिधी.
7875459737.
Discussion about this post