· सारथी महाराष्ट्राचा न्युज (१५/१०/२०२४)
भुसावळ (जळगांव) : पाक्षिक वृत्तपत्र ‘आदर्श रायगड व वृत्तवाहिनी’चा तृतीय वर्धापन दिन नुकताच स्वामी समर्थ मंगल कार्यालय, अंबरनाथ येथे २९ सप्टेंबर २०२४ रोजी साजरा करण्यात आला. या आयोजित कार्यक्रमात यावेळी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, साहित्य, विविध प्रकारे समाजसेवेचे व्रत घेऊन समाजाप्रती जागृत असणारे ६५ मान्यवर यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
‘पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेने राष्ट्र मोठे होते’ या तत्वावर पाक्षिक वृत्तपत्र ‘आदर्श रायगड व वृत्तवाहिनी’ यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. रायगड जिल्हासह ठाणे, मुंबई व महाराष्ट्रातील विविध घटकांच्या सृजनशील उपक्रमांना प्रसिद्धी देण्याबरोबरच वंचित, शोषित घटकांच्या समस्यांना वाचा फोडणे. समाजापर्यंत उपयुक्त ज्ञान, माहिती व प्रबोधन पोहचविणे यासाठी पाक्षिक वृत्तपत्र ‘आदर्श रायगड व वृत्तवाहिनी’ निर्भीड पत्रकारितेचा वसा उत्कृष्टपणे चालवत आहे.
पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील नि:स्वार्थ व उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन गोपाळकुमार चांगदेव कळसकर (आयुध निर्माणी वरणगांव) यांना पाक्षिक वृत्तपत्र ‘आदर्श रायगड व वृत्तवाहिनी’तर्फे तृतीय वर्धापन दिनी ट्रॉफी, सन्मानपदक व सन्मानपत्र देऊन ‘आदर्श रायगड २०२४ (उत्कृष्ट पत्रकार)’ पुरस्काराने गौरविण्यात आले. गोपाळकुमार चांगदेव कळसकर हे दैनिक बाळकडू प्रतिनिधी असून दैनिक योजना दर्पण, सारथी महाराष्ट्राचा अशा वृत्तपत्रांतून त्यांनी जनसामान्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली असून ते झेप फाउंडेशन, पुणे या संस्थेचे जळगांव जिल्हा सचिव आहेत.
पाक्षिक वृत्तपत्र ‘आदर्श रायगड व वृत्तवाहिनी’ च्या तृतीय वर्धापन द्दीन सोहळ्यात अंबरनाथचे आ.बालाजी किणीकर, आ.ज्ञानेश्वर म्हात्रे (कोकण विभाग पदवीधर शिक्षक मतदार संघ), उमेश महाराज शेंडगे, रवींद्र मालुसरे(अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ,मुंबई), नगरसेवक तुळशीराम चौधरी, कृष्णा कदम, सर्जेराव माहुरकर (शहराध्यक्ष बीजेपी,अंबरनाथ), नगरसेवक सचिन पाटील, संपादक रमेश सणस, शैलेश सणस, संपादक अविनाश म्हात्रे, प्रेरणा फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्रेरणा गावकर कुलकर्णी असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पत्रकारांनी समाजहित प्रथम जपले पाहीजे, असा संदेश मान्यवरांनी यावेळी दिला. कार्यक्रमातील गीत संध्या व कोळी नृत्याने उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.
सदर कार्यक्रमाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.पुरस्कार्थी यांच्या या सन्मानाबद्दल त्यांच्यावर अनेक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Discussion about this post