या निवडणुकीत आपण सर्वांनी हेवे दावे विसरून एकदिलाने काम करून संग्राम भाऊंना विधानसभेत पाठवण्यासाठी अहोरात्र कष्ट करून विजयश्री खेचुन आणु.
आज कडेगाव पलूस चा जनतेचा मनातील आमदार म्हणून भाऊंचाकडे बघणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे. इथल्या प्रत्येक घटकाचा आयुष्यात सुखाचे दिवस यावे म्हणून नेहमीच देशमुख कुटुंबाने इथे काम केले.
टेंभू योजनेचे शिल्पकार स्व. संपतराव आण्णा यांचेमुळे त्यांचा दूरदृष्टीतून झालेल्या योजनेमुळे इथला शेतकरी सुखावला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. १९९५साली भिलवडी वांगी विधानसभा मतदार संघात
संपतरावअण्णा देशमुख यांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाला तेव्हा त्यांना युती सरकारमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रीपद देऊ केले होते, तेव्हा संपतराव आण्णानी मला मंत्रिपद नको. माझ्या भागातील जनतेला पाणी द्या.
मी मंत्री होऊन लाल दिव्याच्या गाडीतून फिरावे म्हणून मला लोकांनी निवडून दिलेले नाही तर त्यांच्या कपाळवरचा दुष्काळाचा कलंक फुसण्यासाठी मला विजयी केले आहे. साहेब वर्षानुवर्षे आमची लोक आक्रोश करत आहेत, त्या गरीब जनतेच्या आक्रोशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मला जनतेने आमदार केले आहे असे बाणेदार उत्तर देऊन मंत्रीपद नाकारले होते..
आदरणीय भाऊंनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना विकास कामांचा डोंगर या मतदार संघात उभा केला तोच विकासचा गाडा पुढे नेण्यासाठी संग्राम भाऊंना विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या सर्वांचे संग्राम भाऊंना दिलेले एक मत ही स्व. आण्णाना आदरांजली ठरेल त्यामुळे आपले बहुमूल्य असे मत भाऊंचा पदरी आपण टाकून संग्राम संपतराव देशमुख भाऊ यांना प्रचंड मतांनी विजयी करावे अशी आपणस विनंती करातो.
आपलाच अशोक वाघमारे कडेपूर
Discussion about this post