नायगाव तालुका प्रतिनिधी..
दिपक गजभारे घुंगराळेकर…
नायगाव तालुक्यातील मौजे नरसी येथे बौद्ध मातंग एक्ये परिषदेचे भव्य आयोजन दि.१९/१०/२०२४ रोज शनिवार करण्यात आले आहे.यानिमित्त नायगाव येथील विठ्ठल पाटील गवळी यांचे जनसंपर्क कार्यालय येथे एका पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली आहे….
सदर कार्यक्रम घेण्याचा एकच हेतू असा की मातंग आणि बौद्ध हे एकाच विचारधारावर चालणारे असून व आपल्यामध्ये एकमेकाबद्दल बंधू भाऊ रुजवण्यापेक्षा द्वेश निर्माण करून एकमेकांपासून दूर करण्याचे षडयंत्र मनुवादी विचारसरणी करत असल्याचे देखील माहिती एका प्रसिद्धीपत्रकामध्ये देण्यात आले आहे. यामुळे आपले सामाजिक दृष्ट्याचे फार मोठे नुकसान होत असून यामुळे मनुवाद्यांचा फायदा होत आहे हे आपण किती दिवस सहन करणार याकरिता मातंग आणि बौद्ध समाज एकत्र येऊन एका विचारधारेची बांधील की जोपासून सदर कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
मातंग बौद्ध एक्ये परिषद हा सामाजिक दृष्ट्या भविष्यकाळामध्ये समाजाला बळ देण्याचे ठरेल आणि यामध्ये कुठल्याच प्रकारचे राजकीय हेतू न ठेवता दोन्ही समाजाने एक संघ काम करण्याच्या हेतूने नरसी येथील आदित्य गार्डन नरसी तालुका नायगाव येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय दीपक भाऊ केदार, उद्घाटक अजिंक्य भैय्या चांदणे, प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर दयारामजी मस्के, यांची उपस्थिती लाभणार असून कार्यक्रमाचे आयोजक देविदास सूर्यवंशी, निमंत्रक साईनाथ कांबळे संयोजक गंगाधर कोतेवार, कार्यक्रमाचे मार्गदर्शक भगवानराव अंचोलीकर,नामदेव कांबळे सामाजिक कार्यकर्ते धर्मवाद, व सल्लागार प्राध्यापक डॉक्टर शंकर गड्डमवार,डॉक्टर शिवाजी कागडे, रा.ना.मेटकर भीमराव बैलके,अनिल गायकांबळे, महेश हनवटे लालबा सूर्यवंशी गंगाधर भेदे जळबा सूर्यवंशी. विजय भेदे. यांनी अथक परिश्रमातून बौद्ध मातंग ऐक्य परिषदेचे आयोजन केले आहे तरी सदर कार्यक्रमाला मातंग व बौद्ध समाजातील समाज बांधव उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे…..
Discussion about this post